लातूर प्रतिनिधी - लातूर तालूक्यातील 111 ग्रामपंचायतींनी दि. 24 व 29 मार्च रोजीच्या या दोन्ही दिवशीच्या विशेष कर वसुली दिनाच्या निमित्ताने 68 ला
लातूर प्रतिनिधी – लातूर तालूक्यातील 111 ग्रामपंचायतींनी दि. 24 व 29 मार्च रोजीच्या या दोन्ही दिवशीच्या विशेष कर वसुली दिनाच्या निमित्ताने 68 लाख 65 हजार 756 रुपये इतकी कर वसुली केली आहे. लातूर तालुक्याने आज पर्यंत विक्रमी विशेष कर वसुली लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या नियोजनानुसार झाली आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी 100 टक्के कर भरणा करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी केले होते.
या पूर्वी दि. 28 डिसेंबर 2022 रोजी 20 लाख रूपये, तर 23 जानेवारी रोजी 43 लाख रूपये, तसेच दि.23 फेब्रुवारी रोजी कर वसूली दिनाच्या निमित्त्ताने 1 कोटी 21 लक्ष 37 हजार 663 रुपये इतकी विक्रमी कर वसुली झालेली होतीे. तसेच मार्च महिण्यात 24 मार्च रोजी 26 लाख 60 हजार 838 रूपये, तर दि. 29 मार्च रोजी 42 लाख 4 हजार 918 रूपये अशा प्रकारे गेल्या सहा दिवसात 68 हजार 4 लाख 918 रूपयांची कर वसुली झाली आहे. यात दि. 24 मार्च रोजी आर्वी, बाभळगाव, मुरूड, वरवंटी या ग्रामपंचायतींनी 1 लाखापेक्षा अधिक रूपयांची कर वसूली केली आहे. तसेच दि. 29 मार्च रोजी आर्वी, बाभळगाव, हरंगूळ बू., कासारगाव, कासारखेडा, खाडगाव, मुरूड, महाराणाप्रतापनगर, श्ऊरि या ग्रामपंचायतींनी 1 लाखा पेक्षा अधिक रूपयांची कर वसुली केली आहे. या दोन दिवशीय कर वसुलीत लातूर तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींनी नागरीकांच्याकडून 68 हजार 4 लाख 918 रूपयांची कर वसुली केली आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वांच्या सहकार्यातून कर वसुली होत आहे. ग्रामपंचायतींचा कर भरण्या बद्दल आता भरपूर जागृती झालेली आहे. नागरिक देखील कर भरणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. या भावनेतून कर भरत आहेत, हे पाहून खूप अभिमान वाटत आहे. याही पुढे लोकांनी कराच्या रूपाने दिलेला पैसा त्यांच्याच विकासासाठी वापरला जाणार आहे. नागरीकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून त्यांना लागलेली ही सवय कायमस्वरूपी टिकेल असे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी सांगीतले.
COMMENTS