टाटांचा स्वागतार्ह निर्धार !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

टाटांचा स्वागतार्ह निर्धार !

रतन टाटा हे नाव भारतीय उद्योग जगतातील अत्यंत संयमित आणि तितकेच विश्वासार्ह नाव. भारतीय उद्योग विश्वाची सुरुवात करताना सर्वसाधारणपणे अशी म्हणच पडली की

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार : पटोले
पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार ः कृषिमंत्री धनंजय मुंडे
कारगिल युद्धातील अनुभव ऐकून उपस्थित गहिवरले..!

रतन टाटा हे नाव भारतीय उद्योग जगतातील अत्यंत संयमित आणि तितकेच विश्वासार्ह नाव. भारतीय उद्योग विश्वाची सुरुवात करताना सर्वसाधारणपणे अशी म्हणच पडली की एखाद्याच्या श्रीमंतीची तुलना करायची असेल तर त्याला थेट टाटाची उपमा दिली जायची! आजही हा शिरस्ता कायम आहे. पण आज टाटांच नाव घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता उर्वरित आयुष्य त्यांनी आरोग्याच्या प्रश्नावर काम करण्याचा मानस व्यक्त केल्याच्या भाषणामुळे! टाटा आहे भारतीय रोडावर सर्रासपणे दिसणारे नाव म्हणजे भारतीय महामार्गांवर टाटा या उद्योगाच्या अनेक गाड्या टाटा हे नाव घेऊन सतत धावत असतात! पण केवळ नफा देणारे उद्योगच निर्माण करीत राहणं आणि त्यातच रममाण होणे एवढेच टाटांनी केला नाही तर त्यांनी समाजाला शिक्षित आणि संशोधनाच्या – खासकरून सामाजिक क्षेत्रातील संशोधनासाठी – त्यांनी अनेक प्रशस्त शिक्षणक्रम टाटा इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून सुरु केले. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती केली. शिक्षणाच्या माध्यमातून काम करणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूट आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे टाटा कॅन्सर हॉस्पिटल या दोन्ही संस्था तसं म्हटलं तर सामाजिक उपक्रम करणाऱ्या आणि नफा यापासून परावृत्त असलेल्या संस्था. समाजाचे आपण काही देणे लागतो किंवा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला घडविण्यासाठी आणि त्या समाजाचे आरोग्य राखण्यासाठी आपल्याला काही केले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी केलेलं हे काम निश्चितपणे समस्त भारतीयांना अभिमान वाटणारे आहे. आज त्यांनी आसामच्या दिब्रुगड येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याच्या उद्घाटन समारंभात वयाच्या ८४ व्या वर्षी, आवाजात कंपन असताना केलेले भाषण, हे समस्त भारतीयांना भावणारे आहे. कॅन्सरसारखा आजार आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू लागलेला आहे. मुंबई चे टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे कॅन्सरच्या रुग्णांना वरदान ठरलेले आहे. अतिशय खर्चिक उपचार पद्धती असलेल्या या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना टाटा उद्योगाने निर्माण केलेले टाटा कॅन्सर हॉस्पिटल त्यांच्या आयुष्यात वेदना रहित जीवन प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहिलेले आहे, ही जाणीव प्रत्येक भारतीयाला सुखावणारी आहे. आज आपण सर्व भारतात पहिले तर पंजाबसारख्या राज्यात, ज्या राज्यामध्ये कृषी विषयक हरितक्रांती सर्वप्रथम झाली;  त्या राज्यात आज आपण पाहतो कॅन्सर एक्सप्रेस सारखी गाडी सुरू करावी लागली, ज्यामध्ये कॅन्सरचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे प्रवास करताना दिसतात. अतिशय दयनीय असणार हे दृश्य हे दु:खदायक असलं तरी वास्तव आहे. आता तर आदिवासी प्रदेशांमध्येही कर्करोगाचे रूग्ण डिटेक्ट होऊ लागले आहेत. अशावेळी, रतन टाटा यांनी पुन्हा एकदा नव्या विश्वासाने आणि निर्धाराने भारतात कर्करोग रुग्णालय उपचारांसाठी हॉस्पिटलची साखळी निर्माण करण्याची केलेली घोषणा, ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एकेकाळी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रतन टाटा यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं, टाटा म्हणजे समर्पण, संयम आणि विश्वासार्हता. आस्था त्यांनी दिब्रुगड आसाम मध्ये केलेली घोषणा ही त्यांच्या कंपनीत स्वरांमध्ये ऐकताना प्रत्येक भारतीयाचं मन कदाचित हे लावला असेल ८४ वर्षे वयाची मांडत असताना त्यांनी ज्या पद्धतीने निर्धार व्यक्त केला  प्रत्येक भारतीयाला निश्‍चितपणे अभिमान वाटेल. भारतातच नव्हे तर जगभरात पेस्टीसाईड चा वापर मोठ्याप्रमाणात शेती उत्पादनात केला जात असल्याने कॅन्सर ची समस्या वाढली असे म्हणतात; परंतु, सेंद्रिय शेती करण्याचा आग्रह श्रीलंकेच्या अर्थव्यवस्था उद्वस्त करण्याइतपत भयावह आहे. अशावेळी, रूग्णांवर उपचार करणेसाठी टाटांनी व्यक्त केलेला निर्धार स्वागतार्ह आहे!

COMMENTS