Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाटा कमिन्स कंपनीचे दीड कोटीचे इंधन इंजेक्टरची चोरी

फलटण / प्रतिनिधी : सुरवडी, ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व अ‍ॅसेंम्बली विभागात ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इ

विशाळगड वाचविण्यासाठी विशाल आंदोलनाची वेळ : खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर
कराड शहरात टोळी युध्दातून एकावर खूनी हल्ला
पावसाळ्यात अतिवृष्टीने निर्माण होणार्‍या पुरग्रस्त भागाची पहाणी

फलटण / प्रतिनिधी : सुरवडी, ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व अ‍ॅसेंम्बली विभागात ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेले आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने टाटा कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा या कंपनीमधील वेअर हाऊस व अ‍ॅसेंम्बली विभागामध्ये ठिकठिकाणी ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरुन नेले आहेत. यामध्ये बॉश कंपनीचे, 5295060 या मॉडेलचे 1032 नग, कमिन्स 4384619 या मॉडेलचे 628 नग, कमिन्स 4384786 या मॉडेलचे 586 नग, बॉश कंपनीचे 5306050 या मॉडेलचे 325 नग असे एकूण 2557 इंधन इंजेक्टर चोरीस गेले आहेत.
टाटा कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुरवडी, ता. फलटण ही जागतिक कंपनी असून, सुरवडी येथील प्लांट खुप मोठा आहे. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पहिल्यांदा मटेरियल विभागाने सविस्तर तपासणी करुन चोरीच्या मालाबाबत शहानिशा केली. त्यांनतर कंपनीच्या फायनान्स विभागाने स्वतंत्र ऑडीट केले. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दि. 15 मार्च रोजी तक्रार देण्यात आली असल्याची फिर्याद गुरप्रीत बकशिश भुल्लर, जनरल मॅनेंजर यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

COMMENTS