Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्फ फोर्सची घोषणा

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर दखल घेत कृषी विभागाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास

स्कूल बस चालकानं रेल्वे फाटक तोडत थेट बस रुळावरून नेली.
चीनच्या घुसखोरीवरून संसदेत गोंधळ
नाफेड मार्फत लासलगाव येथे लाल कांद्याची सुरु असलेली खरेदी बंद

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर दखल घेत कृषी विभागाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स अर्थात विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे केली आहे. या कृती दलाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्यासह सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणार्‍या विविध संकटांवर एकत्रित व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचे कृती दल स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
या कृती दलाचे नेतृत्व विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील अनुभवी अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर हे अधिकारी या दलाचे सदस्य असतील. विशेष बाब म्हणजे या दलात केवळ प्रशासकीय यंत्रणाच नव्हे, तर शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्यावर प्रत्यक्ष काम करणार्‍या तज्ज्ञांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. ‘शिवार फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा तसेच महिला शेतकर्‍यांच्या मानसिक आरोग्यावरील अभ्यासासाठी ओळखल्या जाणार्‍या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या कृती दलाच्या कार्यात मानवी संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्यात येणार आहे. कागदोपत्री उपायांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या परिस्थितीचा अभ्यास करून ठोस उपाय राबविणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.

चतुःसूत्री दृष्टिकोनातून सर्वांगीण मदत
या कृती दलाच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकर्‍यांना शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चार अंगांनी मदत करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांकडे एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा हा प्रयत्न आहे. शेतकर्‍यांना नैराश्यातून बाहेर काढणे, संकटांचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे आणि त्यांचा आत्मविश्‍वास पुनर्स्थापित करणे, हे या कृती दलाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यापूर्वी ‘शिवार संसद’ आणि ‘शिवार मदतवाहिनी’ या उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात यश आले आहे.

बदलत्या काळानुसार नवे उपाय ः डॉ. सूरज मांढरे
कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्‍न केवळ आत्महत्येनंतर मदत देण्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. शेतकर्‍याला आधीपासून सक्षम बनवणे, त्याच्या उत्पन्नात वाढ करणे आणि मानसिक स्थैर्य देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील विविध योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.

COMMENTS