Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात द्वितीय आलेल्या तनुश्रीचा संस्थेतर्फे सत्कार

चांदवड- रेड रिबन प्रश्नमंजुषेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या तनुश्री पगारे चा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आल्याची माहिती

Ahmednagar : वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या | LOKNews24
डोंबिवलीत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन
यवतमाळमध्ये डेंग्यूचे थैमान

चांदवड– रेड रिबन प्रश्नमंजुषेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या तनुश्री पगारे चा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती होण्याच्या अनुषांगाने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या तर्फे आयोजित रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 18 जुलै 2024 रोजी श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे ऑनलाईन रेड रिबन प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती त्या स्पर्धेमध्ये श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  तनुश्री राकेश पगारे ही विद्यार्थिनी जिल्हात प्रथम आली होती. याच स्पर्धेचा पुढील टप्पा दि.12 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे येथे राज्यस्तर रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत तनुश्री दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यालयातील या यशस्वी विद्यार्थिनीचा श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेचे सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, प्रबंध समितीचे सदस्य पिंटूशेठ संचेती, रवींद्र आबड, संस्थेचे  प्रशासकीय अधिकारी प्रमोद गाळणकर, आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य दिपाली चंडालिया, विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे, विद्यालयाचे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते तनुश्री आणि तिचे पालक यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यालयाच्या या अतुलनीय कामगिरी बद्दल विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबड, विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, महेंद्र पारख यांनी तनुश्री ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यालयातील यशस्वी विद्यार्थिनीला अतिरिक्त प्रकल्प संचालक विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक शंभरकर, आई.सी. विभाग प्रमुख सुदेशना चक्रवर्ती डॉ.राहुल जाधव, जिल्हा पर्यवेक्षिका सुनीता बोरसे, तालुका समुपदेशक सुनंदा शिंदे, तंत्रज्ञ शितल गायकवाड, विद्यालयातील उपशिक्षक संदिप दराडे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वच घटकांनी आनंद व्यक्त केला.

COMMENTS