श्रीरामपूर : प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी तनुजा भालेराव हिने राहाता येथील शारदा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या थोर
श्रीरामपूर : प्रवरानगर येथील महात्मा गांधी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी तनुजा भालेराव हिने राहाता येथील शारदा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का. ल. शिंदे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. या स्पर्धेत राज्यातून 70 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पार पडलेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत तनुजाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला स्पर्धाप्रमुख सौ. डी. जी. आंबेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य बी.जी.आंधळे, प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे, प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS