Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

बुलडाणा : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये भालगाव व कोलारा

पंंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आढळले भुयार
राणा दाम्पत्यांचा वारीमध्ये सहभाग
स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळा यशस्वितेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

बुलडाणा : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये भालगाव व कोलारा या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती चिखली उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

भालगाव येथे 1 हजार 620 पशुधन व 3 हजार 273 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 96 हजार 600 लिटर्स पाणी पुरवठा करणार आहेत. कोलारा गावाला 4 हजार पशुधन व 4 हजार 856 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 1 लक्ष 76 हजार 660 लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

COMMENTS