Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांदळेश्वर विद्यालयात स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न

बीड । प्रतिनिधीनवगण शिक्षण संस्था संचलित तांदळेश्वर विद्यालय, तांदळवाडी घाट (ता. बीड) येथे स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्

जिल्हापरिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांचा मनमानी कारभार
31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे-वैभव स्वामी
सरकारी कामात अडथळा आणल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता

बीड । प्रतिनिधी
नवगण शिक्षण संस्था संचलित तांदळेश्वर विद्यालय, तांदळवाडी घाट (ता. बीड) येथे स्नेहसंमेलन व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, लावणी, ग्रुप डान्स, सोलो डान्स, कोळी नृत्य आदी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेवर आधारित नृत्यप्रकार सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. सर्व विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक श्याम डाके सर, तसेच तांदळवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर सर व त्यांच्या सहकार्‍यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये सरपंच बळीराम शेठ शिरसाट, उपसरपंच महादेव अण्णा खोसे, ग्रामपंचायत सदस्य शहादेवराव खोसे, अनिल खोसे, माजी मुख्याध्यापक एस. आर. खोसे (आबा), पांचाळ तात्या, पोलीस पाटील दिगंबर रावजी खोसे, माजी उपसरपंच पिंटू शेठ उर्फ श्रीकृष्ण भागडे, चेअरमन संजय खोसे, बापूराव शिरसाट, रामहरी खोसे, बंडू खोसे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ तसेच वर्षभरातील विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना बक्षिसे दिली. या प्रसंगी अंधापुरीचे सरपंच पप्पू जगताप व त्यांच्या धर्मपत्नी मनिषा जगताप उपस्थित होत्या. महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. डॉल्बी व लेझीमच्या तालावर सादर झालेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे मैदान व स्टेज आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. प्रस्ताविकात मुख्याध्यापक श्याम डाके सर यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगून पालकांनी शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन केले. पालक प्रतिनिधी म्हणून उपसरपंच महादेव अण्णा खोसे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षक व शाळेच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यातही शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. शेवटी मुख्याध्यापक श्याम डाके सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. नागरिकांसाठी नाश्ता व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS