Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा ग्रामपंचायत निर्लज्जम सदासुखी

अंबिका नगर परिसरात घाणीचे साम्राज्य... नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!

गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तलवाडा ग्रामपंचायतला स्वच्छतेची अ‍ॅलर्जी असून; अंबिका नगर येथील अंगणवाडी शे

दाखला नसला, तरी शाळेत द्यावा लागेल प्रवास
आनाळा-शेळगाव रस्त्याची दुरुस्ती फक्त नावालाच..! | LOKNews24
मुलींची बेपत्ता होण्याची संख्या चिंताजनक

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तलवाडा ग्रामपंचायतला स्वच्छतेची अ‍ॅलर्जी असून; अंबिका नगर येथील अंगणवाडी शेजारी कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले असून अंगणवाडी जवळच घाण पाण्याची नाली गेल्याने नागरिकांना व अंगणवाडी मध्ये येणार्‍या बालकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्रामपंचायत गावचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांना  अंगणवाडी शेजारील घाण, उकिरडा व नाली काढून देण्यासाठी येथील नागरिकांनी वेळोवेळी तोंडी, प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे सांगून देखील यांच्याकडून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. ढम्म झालेल्या गेंड्याची कातडी पांघरलेली सर्व पदाधिकारी,  निर्लज्जम सदासुखी झालेले आहेत. केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी चिखल तुडवत दारोदारी येतात आणि काम झाल्यानंतर नागरिकास दुर्लक्ष करतात. नागरिकांसाठी महत्वाच्या असणार्‍या स्वच्छता व पिण्याचे पाणी या साध्या दोन गोष्टी सुद्धा नागरिकांना पुरविण्यास ग्रामपंचायत पूर्णपणे अपयशी ठरत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामपंचायत उदासीन असून; अंबिका परिसरात तुळजा भवानी मातेचे मंदिर असून येथे भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात परंतु या परिसरात अर्धवट झालेला रस्ता व घाण पाण्यासाठी नाली काढलेली नसून; ते घाण पाणी बेभरोसे सोडलेले आहे. यामुळे पावसाळ्यात  नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सत्ताधार्‍यांमध्ये दोन गट पडल्यामुळे नागरिकांचे बेहाल होत असून; विरोधकही या गोष्टीकडे काना डोळा करत आहेत. उकिरडा व घाण नाली असल्यामुळे या घाणीची नागरिकांना दुर्गंधी येत आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती करिता पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाय योजना करावी तसेच तुळजा भवानी मंदिराकडे जाणारा अर्धवट रस्ता व नाली बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी केला आहे.

COMMENTS