Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी शाळेचा शताब्दीमहोत्सव उत्साहात

कोपरगाव .प्रतिनिधी ः व्यक्ती असो अथवा संस्था. दोहोंसाठी 100 या आकड्याचे मोठे महत्त्व; पण तो गाठण्याचे भाग्य प्रत्येकालाच मिळते असे नाही. असे भाग्

नस्ती उपलब्ध नसल्यास शिस्तभंगाची कारवाई – शिक्षण उपसंचालक उकिरडे
खून झालेल्या महिलेवर अत्याचार ? व्हिसेरा ठेवला राखून
कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात

कोपरगाव .प्रतिनिधी ः व्यक्ती असो अथवा संस्था. दोहोंसाठी 100 या आकड्याचे मोठे महत्त्व; पण तो गाठण्याचे भाग्य प्रत्येकालाच मिळते असे नाही. असे भाग्य टाकळी (ता. कोपरगाव) येथील प्राथमिक शाळेला मिळाले आहे. शताब्दी साजरी करणारी ती तालुक्यातील पहिलीच शाळा ठरली आहे. शाळेच्या वाढणार्‍या वर्षांसोबत गुणवत्ताही वाढल्याचे दिसून येते. त्याला विविध पुरस्कारांचे कोंदण लाभल्यामुळे अधिक झळाळी मिळाली आहे.अशा या शंभर नंबरी शाळेचा  शतक महोत्सव व शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दोन सञात केक कापुन 101 मेणबत्ती पेटवून विद्युत रोशनाई व फटाक्यांच्या आताश बाजीत मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 प्रथम सत्रात शाळेची माजी विद्यार्थीनी कै. प्रियंका रमेश देवकर हिच्या स्मृतीपित्यर्थ सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, गावातील माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना प्रियंकाचे वडील रमेश देवकर यांनी स्नेहभोजन देत वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन  केले होते. द्वितीय सत्रात माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच संदीप देवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कोपरगाव तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, केंद्रप्रमुख विद्या भोईर, माजी सभापती सुनील देवकर, संचालक निलेश देवकर, पद्मकांत कुदळे उपस्थित  होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मदीना शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे अवचित्य साधून 101 मेणबत्ती पेटवल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केक कापून फटाक्याची आताषबाजी करण्यात आली.  यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती संगीता बोधक यांनी सुंदर गीत गायन करून वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. याच वेळी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर ड्रेपरीमध्ये प्रवेश करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी माजी विद्यार्थी व प्रमुख पाहुणे यांना शाल, बुके, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 7 वी सर्वच विद्यार्थ्यांनी अप्रतिम कलाविष्कार सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांवर दानशूर व्यक्तींनी बक्षिसांची उधळण केली. देणगीतून शाळेला जवळजवळ 32 हजार रुपये प्राप्त झाले. यामध्ये माजी कस्टम अधिकारी बद्रीनाथ देवकर यांनी शाळेला पाच हजार रुपयांचा चेक दिला, तर चीफ इंजिनिअर संतोष देवकर यांनी रोख रुपये पाच हजार एक तर, सुभाष पवार यांनी रोख रुपये 4000 ची देणगी दिली. शतक महोत्सव वर्ष साजरे करण्यासाठी. केक व विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी माजी मुख्याध्यापक राधु हरिचंद्र देवकर यांनी एक हजार रूपये  बक्षीस दिले. निलेश भागवत देवकर यांनी साउंड सिस्टीम व लाईटींगची व्यवस्था केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक मेजर विजयराव गायकवाड, अनिल कांबळे, ज्ञानेश्‍वर अहिरे, अ‍ॅड. संजय मंडलिक, कवी बाळासाहेब देवकर, शशिकांत देवकर, अनेक तरुण मंडळांनी शाळेला देणगी देऊन शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप अण्णासाहेब देवकर, उपाध्यक्ष गणेश नन्नवरे, सदस्य किरण देवकर, ज्येष्ठ मार्गदर्शक छगन नाना देवकर, निलेश देवकर, उपसरपंच संजय देवकर, शाळेचे शिक्षक श्रीमती सुनिता भालेराव, श्रीमती सुवर्णा गाडेकर, जगताप बी. बी. आमले, श्रीमती आरती सिन्नरकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक प्रमोद रणधीर यांनी केले.

COMMENTS