Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृद्ध आईच्या सह्या घेत मुलांनी परस्पर काढले 46 लाख रुपये

मुलांसह सुनांवर गुन्हा दाखल

पुणे ः दोन मुलांसह सुनांनी वृद्ध आईचा विश्‍वास संपादन करून तिच्या सह्या घेऊन बँक खात्यातून 46 लाख रुपये काढून घेतल्याची घटना पुण्यात उघडकीस आली.

BREAKIING:पाडव्याच्या मुहूर्तावर लॉकडाउन निश्चित ! उद्यापासून ८ दिवस लॉकडाउनची दाट शक्यता |LokNews24
स्मृती मानधना प्रख्यात गायकाच्या प्रेमात
घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक

पुणे ः दोन मुलांसह सुनांनी वृद्ध आईचा विश्‍वास संपादन करून तिच्या सह्या घेऊन बँक खात्यातून 46 लाख रुपये काढून घेतल्याची घटना पुण्यात उघडकीस आली. याप्रकरणी वृद्धने मुलांसह सून व नातवांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कुसुम मारुती टिळेकर (82, रा.केशवनगर, मुंढवा, पुणे) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बाळासाहेब मारुती टिळेकर, मिलिंद मारुती टिळेकर या मुलांसह सून सुनीता बाळासाहेब टिळेकर, स्वाती मिलिंद टिळेकर व नात अक्षदा देवकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कुसुम टिळेकर यांना मुले आणि सुना विचारत नाहीत. मात्र, काही दिवसांपूर्वी आपल्या सासूला माहेरहून मोठी रक्कम मिळणार असल्याचे सुनांना समजले होते. त्यामुळे सुनांनी आपल्या पतींसह सासूकडे अचानक जाणे-येणे वाढवले. विश्‍वास संपादन करून त्यांनी बँकेतून पैसे काढले. कुसुम यांना माहेरच्या संपत्तीचा 46 लाख रुपयांचा वाटा मिळाल्यानंतर सर्वांनी कुसुम यांच्या सह्या घेऊन बँकेतून रक्कम काढून घेतली. कुसुम यांना हा प्रकार समजताच त्यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

COMMENTS