राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्याकडे दिल्लीत निवेदनाद्वारे मागणीइस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका काँग्रेस समितीची जागा व इमारत ताब्

राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्याकडे दिल्लीत निवेदनाद्वारे मागणी
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका काँग्रेस समितीची जागा व इमारत ताब्यात घेणेबाबतचे निवेदन वाळवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्ली येथे दिले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस युवक सचिव विजय पवार उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मौजे इस्लामपूर येथे बांधलेल्या इमारतीची जमीन शहर सर्वेक्षण क्रमांक 4451 क्षेत्रफळ 350.15 चौ. मी. हा परिसर इस्लामपूर नगरपरिषद मिळकत क्रमांक 0511000278 च्या मालकीचा आहे आणि 1870.08 चौ. मी. आहे. बांधकाम आणि खुल्या जागेसह संपूर्ण मालमत्ता अध्यक्ष तालुका काँग्रेस समिती वाळवा यांच्या मालकीची आणि भोगवटाची आहे. ही मालमत्ता अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी वाळवा यांच्या मालकीची आणि ताब्यात होती आणि आहे. ही जागा 3 जून 1959 रोजी खरेदी करण्यात आली होती. 15 ऑक्टोंबर 2024 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने, काँग्रेसच्या मालकीची मालमत्ता विकण्यास सांगण्यात आले आहे.
ही मालमत्ता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या मालकीची नाही. राष्ट्रवादीने सन 1978 पासून काँग्रेसच्या मालकीच्या मालमत्तेवर निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन करून कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय, काँग्रेस पक्षाच्या जागा इमारतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यालयाच्या नावाचा फलक लावून बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. काँग्रेसच्या कोणत्याही परवानगीशिवाय पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मालमत्तेवर कब्जा केला आहे, दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS