Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे आवाहन

श्रीगोंदा : तालुक्यातील भाजपच्या आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते  यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवून लोक संपर्

संगमनेरमध्ये कायमस्वरूपी आरटीओचे शिबीर कार्यालय
दुभंगलेली मने जुळवण्याचे काम न्या. नेत्रा कंक यांनी केले
संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय LokNews24

श्रीगोंदा : तालुक्यातील भाजपच्या आजी माजी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते  यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवून लोक संपर्क वाढवला तर येणार्‍या निवडणुकीत पक्षाला निश्‍चितच घवघवीत यश मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी श्रीगोंदा येथे भाजपाच्या श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीत बोलताना केले.
          ना.खडसे पुढे म्हणाल्या राज्यात आपल्याला पुन्हा सत्ता मिळवायची आहे सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या व राबविल्या आपण याचा सातत्याने पाठपुरावा करावा. श्रीगोंदा मतदार संघात संघटना मजबूत आहे आमदार बबनराव पाचपुते यांचे काम देखील उल्लेखनीय आहे,पण अती आत्मविश्‍वास नको तर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन काम करावे. यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले मतदार संघात पाण्यापासून सर्व प्रश्‍न सोडवताना आपण सामाजिक बांधिलकीतून सर्व कामे केली आहेत.तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती त्यामुळे मताधिक्य घटले पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विक्रम पाचपुते व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे मतदार नक्कीच पुन्हा संधी देतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विक्रम पाचपुते यांनी प्रास्ताविक करून केलेल्या कामांचा आढावा दिला.तसेच कार्यकर्त्यांनी ना.खडसे यांच्याकडे महायुतीच्या घटक पक्षातील जबाबदार नेते व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराचा प्रचार केला नसल्याचे निदर्शनास आणून दिले.त्यावर ना.खडसे यांनी याचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचे स्पष्ट केले.
    यावेळी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक शब्बीरभाई बेपारी व सहकार्‍यांनी तसेच विविध गावातील कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी डॉ. प्रतिभाताई पाचपुते, दिनूकाका पंधरकर, गणपत दादा काकडे, पोपटराव खेतमाळीस, प्रतापसिंह पाचपुते, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, बापू तात्या गोरे, पुरुषोत्तम भैया लगड, मिलिंद दरेकर, धनराज कोथिंबिरे, मंगेश घोडके, शुभांगीताई सप्रे, देवयानी शिंदे, सुजाता खेडकर, विद्या शिंदे, उषाताई कर्डिले तसेच सर्व माजी नगरसेवक, भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुतळ्याच्या बाबतीत राजकारण आणू नये – पक्षाने आपल्याला योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या की नाही तसेच पक्षीय संघटन कसे आहे व निवडणुक जिंकण्यासाठी काय उणीवा आहेत याचा आढावा घेण्यासाठी पाठवले असल्याचे सांगितले. तसेच छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधकांनी आस्थेच्या बाबतीत राजकारण आणू नये असे आवाहन करून सरकार याबाबत गांभीर्याने चौकशी करत आहे असे स्पष्ट केले.

COMMENTS