पंचवटी - नाशिक शेतकी तालुका संघाच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी आहे. निवडून आलेल्या संचालकांनी शेतकरी
पंचवटी – नाशिक शेतकी तालुका संघाच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी आहे. निवडून आलेल्या संचालकांनी शेतकरी हिताचे निर्णय घेत, संघाचा विकास साधावा असे प्रतिपादन माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. ते नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नाशिक शेतकी तालुका संघाच्या नवनिर्वाचित संचालकांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठूळे, जगन्नाथ कटाळे, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, माजी संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, संजय तुंगार, उपस्थित होते. तसेच नाशिक शेतकी तालुका संघाचे विजयी झालेले उमेदवार सोसायटी गट दिलीपराव थेटे,शरद गायखे, बबन कांगणे ,रावसाहेब कोशिरे,दिलीप चव्हाण,वयक्तिक गट – विष्णू थेटे ,भिकाजी कांडेकर,शांताराम माळोदे,दीपक हगवणे,महिला राखीव आशा गायकर, इतर मागास प्रवर्ग जयराम ढिकले ,भटक्या विमुक्त जाती जमाती वाळू काकड,अनुसूचित जाती जमाती ढवळू फसाळे उपस्थित होते.तसेच सेंट्रल गोदावरीचे संचालक तानाजी पिंगळे, आबासाहेब बर्डे, विलास कड, विलास कांडेकर भास्कर गोडसे शंकरराव पिंगळे काळू थेटे, हिरो जाधव प्रशांत मोराळे निवृत्ती कांडेकर किसन कांडेकर गोकुळ काकड, गणेश कहांडळ, दौलत पाटील, भाऊसाहेब भावले,धनाजी पेखळे, नामदेव गायकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे माजी खासदार तथा सभापती देविदास पिंगळे म्हणाले की, नाशिक शेतकी तालुका संघाच्या निवडणूकीत सतरा पैकी तेरा जण निवडून आले.आपण कुठे व का कमी पडलो याचा विचार करावा.शेतकी तालुका संघाच्या मागील दहा वर्षात कामकाज कसे चालले. नेमके शेती बी बियाणे, खते शेतकऱ्या पावेतो पोहचले की नाही की आणि कुठे पोहचले, यांची चौकशी केली पाहिजे. तालुका संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पोच बि बियाणे व खते कसे पोहोचतील या साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच अल्प भाडे तत्त्वावर जागा घेत शेतकऱ्या पर्यत शेतकी तालुका संघाच्या माध्यमातून मदत कशी पोहचेल यासाठी काम करावे. तसेच प्रास्ताविकात उपसभापती उत्तमराव खांडबहाले यांनी केले. माजी सभापती तथा संपतराव सकाळे यांनी शेतकी तालुका संघाचे कामकाज हे माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरळीत चालेल.सहकार क्षेत्रात असलेला पिंगळे यांचा अनुभव मोलाचं असुन सरकार दरबारी देखील त्यांच्या माध्यमातून कामे करता येतील असे सांगितले.
COMMENTS