Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची काळजी घ्या : पोलिस निरीक्षक गायकवाड

जामखेड प्रतिनिधी ः सर्वच धार्मिक स्थळांच्या सूरक्षा व त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्ण करा. तसेच धार्मिक स्थळांबाबत कोणत्याही प्रकारच्या सम

*तुमचे आजचे राशीचक्र शनिवार २६ जून २०२१ l पहा LokNews24*
पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत
आधी तक्रार करूनही निर्णय घेतला नाही : जाधव यांच्या वकिलांचा युक्तिवाद

जामखेड प्रतिनिधी ः सर्वच धार्मिक स्थळांच्या सूरक्षा व त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना पुर्ण करा. तसेच धार्मिक स्थळांबाबत कोणत्याही प्रकारच्या समस्या, वाद असतील तर त्या योग्य रीतीने सोडविण्यासाठी पोलीस स्टेशनशी संपर्क करा, संवाद करा असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी धार्मिक स्थळांचे धर्मगुरू व प्रमुखांच्या बैठकीत केले. तालुक्यातील जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिर,मस्जिद,दर्गा आदीं धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत ट्रस्ट अध्यक्ष, मंदिर पुजारी, मस्जिदचे ट्रस्टी, मौलाना, पोलिस पाटील यांची बैठक दि 30 रोजी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.या बैठकीमध्ये मंदिर, मस्जिद, दर्गा आदींच्या सुरक्षा संदर्भात खालीलप्रमाणे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या.  मंदिर, मस्जिद व इतर सर्व धार्मिक स्थळांना चांगल्या प्रतीचे लर्लीींं कॅमेरे बसवावेत. सर्व धार्मिक स्थळांना खाजगी सुरक्षा रक्षक/स्वयंसेवक नेमावा. धार्मिक वाद किंवा इतर जुने वाद असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी.मंदिर/मस्जिद ट्रस्ट, पुजारी, मौलाना,यांची गावपातळीवर जातीय सलोखा मिटिंग घ्यावी. गावातील यात्रा ,उत्सव ,व इतर कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाची परवानगी घेण्यात घ्यावी. पोलीस बंदोबस्ताची पोलीस स्टेशन ला मागणी करावी. गावातील मंदिर मस्जिद दर्गा यांचे ट्रस्ट यादी ,मौलाना ,व पुजारी यांची यादी पोलीस स्टेशनला द्यावी.पोलीस स्टेशनचा नंबर मंदिर/मस्जिद आवारात सर्वांना दिसेल असा लावावा. यासह अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सविस्तर चर्चा करतांना धार्मिक स्थळांचे प्रमुख व धर्मगुरूंचे म्हणणे ऐकून घेतले तेव्हा अनेक ठिकाणी चांगल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जेथे नाहीत तेथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला मंदिर ,मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष ,पुजारी, मौलाना,पोलिस पाटील असे 45  लोक उपस्थित होते.

COMMENTS