Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिल्ल समाज स्मशानभूमी अतिक्रमण प्रकरणी कार्यवाही करा

गटविकास अधिकारी यांचे अहवाल सादर करून कार्यवाही करण्याचे आदेश

निमगावखैरी ः श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभुमी शेजारी व्यवसायीकांनी अतिक्रमण केले असून स्मशानभूमि शेजारी असलेले अति

इंधन दरवाढीवरून केंद्र-राज्य संघर्ष
कुमार जगताप यांना जीवे मारण्याची धमकी ; कुळधरणमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
25 गोशाळेसाठी वर्धमान संस्कार धामकडून 25 लाखांची देणगी

निमगावखैरी ः श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभुमी शेजारी व्यवसायीकांनी अतिक्रमण केले असून स्मशानभूमि शेजारी असलेले अतिक्रमण तातडीने काढण्यात करण्यात यावे या मागणीचे निवेदन सामाजिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला देण्यात आले होते.
सदर निवेदनानुसार, खैरी निमगांव येथील वैजापूर-कोपरगाव चौफुली याठिकाणी भिल्ल समाजाची स्मशानभुमी असून त्या स्मशानभूमी शेजारी व्यवसायीकांनी अतिक्रमण केलेले असून या ठिकाणी असलेला एकलव्य समाजाचा बोर्ड देखील काढून टाकण्यात आला आहे. तरी संबंधीत अतिक्रमण तातडीने काढून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान सदर अर्जावर योग्य कार्यवाही करून अहवाल सादर करण्याची सुचना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सिनारे यांच्या सहीनिशी देण्यात आली आहे. या संदर्भातील प्रत एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष तक्रारदार राजेंद्र भालेराव यांना देण्यात आली आहे.

COMMENTS