तब्बल 110 वर्षांनी झाली संस्थेची घटना अंतिम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल 110 वर्षांनी झाली संस्थेची घटना अंतिम

आडते बाजार मर्चंट असोसिएशन पहिले विश्‍वस्त मंडळ नियुक्त

अहमदनगर/प्रतिनिधी : स्वातंत्र्यपूर्व काळात 1912मध्ये स्थापन झालेल्या नगरमधील अहमदनगर आडते बाजार मर्चंटस असोसिएशन संस्थेची घटना तब्बल 110 वर्षांनी म्ह

पढेगाव ग्रामपंचायतकडून महिलांचा सन्मान
गोरगरीबांचे आशीर्वाद जीवनात महत्वाचे – हभप दीपक महाराज देशमुख
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : स्वातंत्र्यपूर्व काळात 1912मध्ये स्थापन झालेल्या नगरमधील अहमदनगर आडते बाजार मर्चंटस असोसिएशन संस्थेची घटना तब्बल 110 वर्षांनी म्हणजे 2022मध्ये अंतिम झाली आहे. सहायक धर्मादाय आयुक्तांनी त्यानंतर संस्थेच्या प्रथम विश्‍वस्त मंडळाची नेमणूक केली व सहा महिन्यात नव्या पदाधिकार्‍यांची निवड करण्याचे आदेश दिले.
याबाबतची माहिती अशी की, अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन ही 110 वर्षांपूर्वीची जुनी संस्था असून या संस्थेची घटना आजपावेतो मंजूर नव्हती. त्यामुळे संस्थेचे कामकाज करणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे होते म्हणून संस्थेचे विश्‍वस्त झुंबरलाल घेवरचंद बोथरा यांनी स्कीम चौकशी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन सहाय्यक धर्मदाय आयुक्त सातव यांनी नुकतेच आदेश करून संस्थेची घटना मंजूर केली व संस्थेच्या प्रथम विश्‍वस्त मंडळाची नेमणूक केली असल्याची माहिती संस्थेचे विश्‍वस्त संतोष कनकमल बोरा यांनी दिली.
अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनने अहमदनगर येथील मे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे स्कीम चौकशी अर्ज नंबर 11/ 2017 हा अर्ज झुंबरलाल घेवरचंद बोथरा व इतर सोळा यांनी केला होता. या अर्जाची चौकशी होऊन सहाय्यक धर्मदाय आयुक्त सातव साहेब यांनी या अर्जाची चौकशी करून संस्थेची घटना मंजूर केली व संस्थेचे प्रथम विश्‍वस्त मंडळ म्हणून झुंबरलाल घेवरचंद बोथरा, अशोकलाल रामलाल गांधी, प्रेमराज धनराज पितळे, संतोष कनकमल बोरा, शांतीलाल मोतीलाल गांधी, चांदमल हस्तीमल मुथ्था, मनीष तलकसी सावला, दीपक ताराचंद बोथरा, गोपाल गंगाबिसन मिनियार, राजेंद्र पन्नालाल डागा, सुशीलकुमार वसंतलाल भळगट, हिरालाल झुंबरलाल चोपडा, प्रकाश गोविंदराव सावंत, विश्‍वनाथ केदारनाथ कासट, अजित शांतीलाल भंडारी, सतीशलाल आनंदराम गुंदेचा व शैलेश पोपटलाल गांधी या सर्वांची प्रथम विश्‍वस्त म्हणून निवड करण्यात आली तसेच या विश्‍वस्त मंडळाने सहा महिन्याच्या आत संस्थेच्या पदाधिकार्‍यांची नेमणूक करून तशी नोंद धर्मदाय आयुक्तांकडून करून घ्यावी असा आदेश दिला. या आदेशामुळे व्यापारी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण असून व्यापारी वर्गाच्यावतीने अ‍ॅडव्होकेट पांडुरंग बल्लाळ यांनी काम पाहिले.

COMMENTS