Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदवड येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन 

चांदवड: चांदवड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे चांदवड येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नितीन दाद

ऐतिहासिक चांद्रयान-3 मोहीम यशस्वी
तरुण तरुणींनी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी लावले हुसकावून (Video)
विजय स्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायांनी केले अभिवादन

चांदवड: चांदवड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे चांदवड येथील तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नितीन दादा आहेर यांच्या नेतृत्वात चांदवड तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा यासाठी चांदवड तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा वाजेच्या सुमारास धरणे आंदोलनाची सुरुवात करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावर्षी चांदवड तालुक्यात अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला असून प्रशासनातर्फे काही भागांमध्ये पिण्याचे पाण्याचे टँकर चालू असूनही शासन दरबारी चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्यात विलंब होत आहे. सद्यस्थितीला तालुक्यात जनावरांचा चारा पिण्याची पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने शासनाने त्वरित चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बल्ले माफ करावी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये सूट मिळावी. मका पिकाला चार हजार रुपये भाव व सोयाबीनला आठ हजार रुपये भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. अशा विविध मागण्या निवेदना मार्फत करण्यात आले असून यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर, शहर प्रमुख प्रसाद प्रजापत, सोमनाथ पगार, बापू आहेर, विलास संसारे, शंभूराजे खैरे ,समाधान गांगुर्डे, साहेबराव ठोंबरे, धीरज संकलेचा, गुड्डू खैरनार, तोसिफ शेख ,अकबर भाई, बापू शिरसाट ज्ञानेश्वर आवारे, प्रदीप आहेर, संदीप कोकणे ,रवींद्र काळे, खंडेराव पगार आदींचे शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

COMMENTS