Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वीस महिला अभ्यास मंडळाची ‘ ध्रुव’ भेट ; सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक

संगमनेर : हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता आणि सर्वांगीण विकासाच्या सिद्धांतावर काम करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलला स्वीसच्या

कामावरून घरी परतताना अज्ञात वाहनाने उडविले
शाहू महाराजांमुळे संभाजीराजे छत्रपती यांची माघार
आरक्षणासाठी परीक्षेत पेपरवर लिहिलं ‘एक मराठा कोटी मराठा
Dhruv Globle.JPG

संगमनेर : हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता आणि सर्वांगीण विकासाच्या सिद्धांतावर काम करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलला स्वीसच्या अभ्यास मंडळातील सदस्यांची भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणार्‍या विविध उपक्रमांना भेट देवून त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनासह नृत्य आणि मल्लखांबाचे प्रात्यक्षिक पाहुन त्यांनी भरभरुन कौतुकही केले.

     शालेय, सहशालेय क्षेत्रासह विद्यार्थ्यांना नवनवीन शैक्षणिक अनुभव देणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी स्वीस अभ्यास मंडळाच्या सदस्या करस्टीन आणि लेना यांनी शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने औंक्षण करीत त्यांचे स्वागत केले. या प्रतिनिधींनी प्राचार्यांशी संवाद साधून दिवसभरातील शाळेचे वेळापत्रक समजावून घेतले. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष वर्गात बसून परिपाठाचाही अनुभव घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या संकल्पनाही जाणून घेतल्या.

     शाळेची कॅम्पस भेट पूर्ण करीत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती करवून घेतल्यानंतर त्यांनी प्राचार्य व शिक्षकांशीही मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्यासह गायन आणि मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक अनुभवतांना त्यांनी त्याला दादही दिली. यावेळी बोलताना या दोघींनीही ‘धु्रव’ची भेट नेहमी स्मरणात राहील असे सांगत शाळेचे शैक्षणिक तत्त्वज्ञान, अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीचा अभ्यास करता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

     यावेळी या दोघींनी सामाजिकस्तरावरील आर्थिक विकासाची धडपड अनुभवण्यासाठी स्थानिक पातळीवरील महिलांच्या सूक्ष्म उद्योगासह गोशाळेलाही भेट दिली. शाळेचा निरोप घेताना स्वीसच्या महिला प्रतिनिधी मंडळाने ध्रुवच्या वेगळ्या आणि सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक करताना पुन्हा येण्याची इच्छाही व्यक्त केली.

COMMENTS