Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण-कोयना मार्गावरील अपघातात स्विफ्टचा चक्काचूर, 3 गंभीर जखमी

येराड येथे अपघाता चक्काचूर झालेली स्विफ्ट कार पाटण / प्रतिनिधी : पाटण-कोयनानगर मार्गावरील एमआयडीसीनजीक भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट

महाराष्ट्रात येणारे मोठे उद्योग गुराजतला कसे गेले : राजवर्धन पाटील
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांचे आवाहन
महावितरणची डिजीटायजेशनकडे वाटचाल : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण वाढले

पाटण / प्रतिनिधी : पाटण-कोयनानगर मार्गावरील एमआयडीसीनजीक भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीवर जावून आदळली. यात गाडीतील 3 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून ही गाडी पाटण पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याची असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. दरम्यान या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण-कोयनानगर मार्गावरील पाटणपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असणार्‍या येराड गावच्या हद्दीत रविवार, दि. 28 रोजी रात्रीच्या सुमारास एमआयडीसीनजीक भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार थेट रस्त्याकडेला इलेक्ट्रीक डीपीवर जावून आदळली. या अपघातात गाडीतील तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून जीवीतहानी झाली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त गाडी ही पाटण पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याची असल्याची चर्चा घटनास्थळी होती. यात सदर पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते आहे. या अपघाताची नोंद सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाली नव्हती.

COMMENTS