Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन

अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पाथर्डी ः येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन

‘बैल गेला आणि झोपा केला’ आता पंचनामे करून उपयोग काय ? सरसकट  मदत द्या – दादासाहेब खेडकर
शिर्डी स्थानकात एक्सप्रेसमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह .
*LOK News 24 I दखल* अहमदनगरचा विकास का झाला नाही ?

पाथर्डी ः येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त स्वररंग युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत वर्षभर राबविण्यात येणार्‍या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.गर्जा महाराष्ट्र माझा, शिवाजी महाराजांवरील पोवाडा, महाराष्ट्राची बहारदार लावणी, मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, संदेशे आते है आदी देशभक्तीपर गीते व नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बबन चौरे, विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, सांस्कृतिक विभागाच्या डॉ. वैशाली आहेर, डॉ अशोक डोळस, कॅप्टन अजयकुमार पालवे, प्रा. विजयकुमार म्हस्के, प्रा. ब्रम्हानंद दराडे, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. अशोक कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभय आव्हाड म्हणाले, महाविद्यालयीन जीवन हे खूप अमुल्य असून ते परत परत अनुभवता येत नाही.म्हणून महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा. महाविद्यालयात राबविण्यात येणार्‍या एनसीसी, एनएसएस इ उपक्रमामध्ये भाग घ्या.जीवन कसे जगायचे हे आपल्याला कॉलेज जीवन शिकविते. अभ्यासाशिवाय अभिनय व खेळांमध्ये सहभाग नोंदवा. त्यामधेही करियर करता येते याची अनेक उदाहरणे जगामध्ये आहेत. महाविद्यालयीन जीवन तुम्हाला फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घ्यायला शिकविते. मोबाईलच्या आहारी न जाता महाविद्यालय जीवनातील तीन वर्षे अभ्यास केल्यास आपले इच्छित ध्येय नक्कीच गाठता येते.यशस्वी होण्यासाठी पैशांपेक्षा कष्ट, चिकाटी व संयमाची आवश्यकता असते. अभय आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात लिंगभाव समानता या विषयावर भव्य अशा रांगोळी स्पर्धेचे व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी डॉ. वैशाली आहेर व डॉ अशोक डोळस यांनी परिश्रम घेतले.यानिमित्ताने महाविद्यालयात संजीवनी रक्त केंद्र छ.संभाजीनगर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अभय आव्हाड,विश्‍वस्त नंदुशेठ शेळके, प्राचार्य डॉ. बबन चौरे उपस्थित होते. महाविद्यालयातील 27 विद्यार्थ्यांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदविला.एनएसएस विभागप्रमुख डॉ.अरुण राख,एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन अजयकुमार पालवे,प्रा.आनंद घोंगडे यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.

COMMENTS