पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात 26 वर्षीय प्रवासी तरूणीवरती बलात्कार केलेल्या नराधम आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. दत्ता गाडेल
पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात 26 वर्षीय प्रवासी तरूणीवरती बलात्कार केलेल्या नराधम आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांची तेरा पथकं त्याच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे दत्ता गाडेला पकडून देणार्याला पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. तो त्याच्या मुळगावी लपला असण्याची शक्यता असल्याने शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा दत्ता गाडे रहिवासी आहे. याच गावात आरोपी दत्ता गाडे यांचे घर आहे. स्वारगेटमध्ये अत्याचार केल्यानंतर गाडे याने थेट शिरूर गाठले होते अशी माहिती आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याठिकाणी देखील तपास सुरू आहे. पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत.
तरुणीने आरोपीला विरोध केला नाही : गृह राज्यमंत्री कदम
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी बलात्काराचे हे प्रकरण फोर्सफुली घडले नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, स्वारगेट एसटी स्टँडवर जी घटना घडली त्यामध्ये कुठलाही स्ट्रगल किंवा फोर्सफुली कृती झाली नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने विरोध न केल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला. आता आरोपी ताब्यात आल्यावर आणखी गोष्टी स्पष्ट होतील असे कदम यांनी म्हटले आहे.
COMMENTS