Homeताज्या बातम्यादेश

ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकताच स्वप्नील कुसाळे याच्या पदोन्नतीला रेल्वेचा हिरवा कंदील

नवी दिल्ली- स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. स्वप्निल कुसाळे यांने पुरूषांच्या 50 मी

अखेर शिंदे सरकार तरले
बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या वाहनावर हल्ला |

नवी दिल्ली– स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. स्वप्निल कुसाळे यांने पुरूषांच्या 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशनमध्ये 451.4 स्कोअर करत तिसरे स्थान पटकावले. दृवप्निलच्या या विजयानंतर नऊ वर्षापासून रखडलेल्या पदोन्नतीला रेल्वेचा हिरवा कंदील मिळाला. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला स्वप्निल 2015 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ‘कमर्शियल कम तिकीट क्लर्क’ म्हणून भारतीय रेल्वेत रुजू झाला होता.

दृवप्निल हा सन 2015 पासून मध्य रेल्वेत काम करत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील कांबळवाडी गावातील 28 वर्षीय स्वप्नील 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. परंतू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला आणखी 12 वर्षे वाट पाहावी लागली. गुरुवारी निवेदन जारी केल्यानंतर आता भारतीय नेमबाजाला डबल प्रमोशन मिळाल्याचे नक्की झाले आहे. स्वप्नील हा तिकिट क्लार्कवरून आता ओएसडी अधिकारी झाला आहे.

स्वप्निल याने कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्याच्या प्रमोशनबद्दल भाष्य केले होते. प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी सांगितले की, ‘तो त्याच्या कार्यालयाच्या वागण्यामुळे खूप निराश झाला होता. गेल्या नऊ वर्षांपासून तो रेल्वेमध्ये काम करत आहे. मात्र, प्रमोशनसाठी त्याचा कधीही विचार करण्यात आला नाही.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रक म्हटले आहे की, कुसाळे याने कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. या कामगिरीमुळे भारताच्या पदक तालिकेतच भर पडली नाही तर स्वप्नील भारतीय नेमबाजी खेळातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला आहे. स्वप्निल कुसाळे याच्या कामगिरीचा भारतीय रेल्वेला खूप अभिमान आहे. त्याचे समर्पण आणि कठोर परिश्रम यामुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून 1 कोटीचे बक्षिस : मुख्यमंत्री – 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. स्वप्नील कुसाळेचे वडील आणि प्रशिक्षक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि व्हिडिओ कॉलद्वारे त्याला शुभेच्छा दिल्या. ऑलिम्पिकमधून परतल्यावर त्याचे स्वागत केले जाईल.

COMMENTS