Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वामीनाथन आयोग लागू करावा : नाना पाटेकर

पुणे ः शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, सर्व शेतमाल गोष्टीचे भाव शेतकर्‍यांना मिळेल तरच शेतकरी यांचा

शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली
केज शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट

पुणे ः शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा, सर्व शेतमाल गोष्टीचे भाव शेतकर्‍यांना मिळेल तरच शेतकरी यांचा सन्मान होईल. अनेक पुरस्कार मला मिळाले पण नाम मध्ये काम करून जे समाधान मिळाले ते शब्दात व्यक्त करण्या पलीकडे आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जीभ आणि दात असे नाते असेल पाहिजे असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय जल शक्ती मंत्री चंद्रकांत पाटील,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाम फाऊंडेशन यांनी नऊ वर्षात अनेक बदल बनवले. केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकते असे काही जणांना वाटते पण नाना, मकरंदसारखे लोक बदल घडवत असतात. राज्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी केवळ मोठी धरणे बांधणे आवश्यक नसून जलसंवर्धन कामे होणे गरजेचे आहे. 24 हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याचे दिशेने काम करण्यात येत आहे. जलसंवर्धन केले तरच शेतकरी आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात. जलयुक्त शिवार माध्यमातून मोठा कार्यक्रम सुरू केले त्यास लोकचळवळ मध्ये रुपांतरीत काम करण्याचे नाम फाऊंडेशन यांनी केले. ग्लॅमर असलेली अनेक मंडळी देशात आहे. दोघांचे व्यक्तिमत्त्व असे आहे की ते सर्वांना आपले वाटतात. त्यांचा स्वार्थ नाही आणि ते खरे सांगत आहे असे लोकांना वाटून लोकचळवळ उभी राहिली. एक हजार पेक्षा अधिक गावात त्यांनी काम केले. नेतृत्व केवळ राजकीय नसून लोकांना प्रेरित करून जिंकणे जिद्द निर्माण करणे महत्वाचे आहे. समाजाचं परिवर्तन घडवू शकतो हे दाखवून दिले आहे.नाना माझे मोठे भाऊ असून पूर्वी मी खूप आवेशाने मोठ्याने भाषण करत होतो . मात्र, नाना मला फोन करून सांगत की, कमी आवाजात बोल अन्यथा हार्ट अटॅक येईल. त्यामुळे आज मी जे शांत भाषण करतो त्यामागे नाना यांचा हात आहे. केंद्रीय जल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी शेतकरी असून माझ्याकडे 150 एकर शेती आहे. शेतातील कामे मी केली आहे. मोदी सरकार मध्ये गेल्यावर निर्णय घेतला की, देशात एक ही गाव असे राहणार नाही जिथे पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार नाही. काम करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून त्याकरीता विश्‍वासाहर्ता आवश्यक आहे. गावाचे पावसाचे पाणी वाहून न जाता ते जिरवण्यासाठी काम करणे महत्वाचे आहे.

COMMENTS