रायगड प्रतिनिधी - रायगड(Raigad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर(Harihareshwar) च्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद ब
रायगड प्रतिनिधी – रायगड(Raigad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर(Harihareshwar) च्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी धाव घेतली. संशयास्पद बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. डी वाय एस पी. तहसीलदार एसआरटी टीम अध्यक्ष सुहेब हमदुले आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले असून बोटीची पाहणी केली जात आहे.

COMMENTS