नागपूर :मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यम
नागपूर :मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. शुक्ला याने कल्याणमधील योगीधाम परिसरात असणार्या अजमेरा हाईटस् या इमारतीमध्ये राहणार्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी असणार्या मराठी कुटुंब असणार्या देशमुख कुटुंबीयांना गुंडांकरवी मारहाण केली होती. देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात अखिलेश शुक्ला यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर हा मुद्दा आमदारांनी विधिमंडळात उचलून धरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले.
विरोधकांनी शुक्रवारी हा मुद्दा विधानपरिषदेच्या पटलावर मांडला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत निवेदन करत अखिलेश शुक्ला यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातून निलंबित करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सभागृहाला मुंबई व परिसरातील मराठी माणसांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली. फडणवीस म्हणाले, अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीचा कर्मचारी आहे. त्याच्यावर व त्याच्या पत्नीवर मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खडकपाडा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरची कॉपी माझ्याकडे आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील कारवाई पोलिस करतील. या प्रकरणी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे, होता व राहील. कधीकधी काही नमुने अशी चुकीची विधाने करतात, माज आणल्यासारखे करतात, पण सरकार अशा माजोरड्यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही.
COMMENTS