औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

कॅबिनेटची बैठक घेऊन आज अधिकृत घोषणा करणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई/प्रतिनिधी :राज्यात सुरु असलेल्या औरंगाबादच्या नामांतराचा वाद अजूनही मिटण्याचे चिन्हे नाहीत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या संभ

निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संपाची हाक
महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा : राजेश टोपे
समृद्धीवरील अपघातात 12 जणांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी :राज्यात सुरु असलेल्या औरंगाबादच्या नामांतराचा वाद अजूनही मिटण्याचे चिन्हे नाहीत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराला स्थगिती दिली असून, आज शनिवारी कॅबिनेटची बैठक घेऊन नामांतराची अधिकृत घोषणा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शहरातील रविंद्रनाट्य मंदिर येथे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा फटकेबाजी करत ठाकरे आणि आघाडीवर चौफेर फटकेबाजी केली.
आम्ही बंडखोरी केली नसून हिंदुत्त्वाचा विचार पुढे नेण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी होताना चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर डोक्यातून मुख्यमंत्री होण्याचा विचार काढला, अशी खंत बोलून दाखवली. तर उद्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब करणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. शिवसैनिकांनी मला प्रोत्साहन दिले. आमच्यावर आरोप झाले की आम्ही बंडखोरी केली. आम्ही जबरदस्तीने आमदारांना गुवाहाटीला नेले. पण, ही सर्व लोक स्वखुशीने माझ्यासोबत आहेत. आमदार शहाजी बापू यांनी गुवाहाटीचे पर्यटन देशभर केले. आम्ही जबरदस्तीने कोणालाही नेले नव्हते. सगळेजण आनंदाने राहात होतो. हे एकदोन दिवसांचे काम नव्हते. सत्ता सोडून ज्याकडे काहीच नाही, त्या शिंदेसोबत हे लोक आले. मी आमदारांना विश्‍वास दिला होता, की मला माझी काळजी नव्हती. काही झाले तर सर्व मी माझ्या अंगावर घेईल. पण, तुमच्या राजकीय कारकीर्दीला काहीच होऊ देणार नाही. आम्ही संयम बाळगत होतो. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. एकीकडे चर्चेला पाठवायचे तर दुसरीकडे पदांवरुन काढायचे.

अल्पमतात असतांना घेतलेले निर्णय घटनाबाह्य
महाविकास आघाडीसोबत जाताना अनेकांनी मला सांगितले होते, की हे चुकीचे आहे. मात्र, पक्षप्रमुखांचा आदेश आम्ही पाळला. नामांतरण चुकीचे पद्धतीने करण्यात आले आहे. उद्या शनिवारी आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन हा निर्णय पुन्हा घेणार आहे. आधी चर्चा काय झाली ते सांगणार नाही. पण, त्यानंतर डोक्यातून मुख्यमंत्री होण्याचा विचार काढला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय आम्ही उद्या कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. त्यामुळे नामांतराचा निर्णय घटनाबाह्य होता. त्या कॅबिनेटमध्ये 200-300 निर्णय घेतले ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन या निर्णयांवर शिक्कामोर्तब करू, असे स्पष्टीकरण यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

आनंद दिघेंवर सिनेमा बनवला, तोही आवडला नाही
’मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर ’धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा बनवला. तोही आवडला नाही.’ असा गौप्यस्फोट करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ’तसेच दिघे साहेबांनी शिवसेना मोठी केली पण त्यांना काय मिळाले?… यावर देखील मी वेळ येईल तेव्हा नक्की बोलेल.’ असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ’इतिहास घडवला दिघे साहेबांनी. या ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेना एवढी मोठी केली की, घराघरात आजही त्यांचे फोटो आहेत. काय मिळाले त्यांना.. वेळ येईल तेव्हा नक्की बोलेल मी. नक्की बोलेल, असा इशारा देखील दिला.

COMMENTS