Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाईफेक प्रकरणी 10 पोलिसांचे निलंबन

7 पोलिस कर्मचार्‍यांसह 3 अधिकार्‍यांचा समावेश

पुणे/प्रतिनिधी ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी उच्च व तंत्र शिक्ष

Ahmednagar : जिल्ह्यातील लॉकडाउनला विरोध…भाजप आमदारांच्या भागात कडक लॉकडाउन (Video)
राज्यपालांचा मराठीद्वेष
टॉपच्या फॅशन डिझायनरचा घरातच संशयास्पद मृत्यू | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविषयी राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याचा उद्रेश शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद रविवारी पोलिस दलात उमटले.


मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 10 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 7 पोलिस कर्माचरी तर 3 पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंरतही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सगळीकडे उमटत आहे. तसेच या संबंधित प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी दिलगिरी व्यक्त करूनही काल शनिवारी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. मात्र, त्यांच्या या विधानामुळे अनेक संघटना या आक्रमक झाल्या होत्या. त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती देखील चंद्रकांत पाटील यांनी केली होती. असे असतांनाही आयुक्त अंकुश शिंदे यांनी सुरक्षेत कसूर केल्या प्रकरणी पोलिसांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. काहींनी या घटनेचा निषेध केला तर काहींनी या घटनेचे स्वागत केले. दरम्यान, हल्ला करणार्‍यांवर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये असे चंद्रकांत पाटील यांनी सांगूनही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पाटील यांच्या सुरक्षेत कसूर केल्या प्रकरणी 11 पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे. यात 7 पोलिस कर्मचारी तर 3 अधिकार्‍यांचा समावेश आहे.


या पोलिस कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांचे निलंबन – पोलिस निरीक्षक सतीश नांदूरकर (गुन्हे शाखा, युनिट 2),पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे (गुन्हे शाखा),गणेश दत्तू माने (चिंचवड पो.स्टेशन), ए एस आय भाऊसाहेब मुरलीधर सरोदे (चिंचवड पो.स्टेशन), ए एस आय दीपक महादेव खरात (गुन्हे शाखा),पो. हवालदार प्रमोद सूर्यकांत वेताळ (गुन्हे शाखा), पो.नाईक देवा शिवाजी राऊत (गुन्हे शाखा), पो. नाईक सागर दशरथ अवसरे (गुन्हे शाखा), महिला पो. कांचन प्रशांत घवले (चिंचवड पो.स्टेशन), महिला पो. प्रियांका भैय्यालाल गुजर (मुख्यालय).


या तिघांना पोलिसांनी केली अटक – चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवड येथील एका ठिकाणी गेले असता त्यांच्यावर मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणी या तिघांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.

COMMENTS