नागपूर ः राज्यातील बहुचर्चित ललित पाटील ड्रग्जप्रकरणावरून मंगळवारी विधिमंडळात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी दोषींना सरकार पाठीशी घालणार ना
नागपूर ः राज्यातील बहुचर्चित ललित पाटील ड्रग्जप्रकरणावरून मंगळवारी विधिमंडळात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी दोषींना सरकार पाठीशी घालणार नाही, या प्रकरणात ज्यांचा थेट सहभाग असेल, असा सर्वांचे निलंबन केले जाईल, तसेच या प्रकरणात थेट संबंध असलेल्या एकूण 10 पोलिसांना थेट निलंबित करण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी बोलतांना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, ’ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांचा सहभाग नाही. मात्र कर्तव्य योग्य न बजावल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एक प्रकारे आपले कर्तव्य न बजावून पोलिसांनी मदतच केली आहे. तसेच सरकारला याप्रकरणी झिरो टॉलरन्स पॉलिसी ठेवायची आहे असेही ते म्हणाले. याप्रकरणी आतापर्यंत 311 अंतर्गत 4 पोलिस बडतर्फ करण्यात आले आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांव्यतिरिक्त 6 इतर पोलिसही निलंबित करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण 10 पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीफडणवीस यांनी सभागृहात दिली. पुढे ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांच्या अटकेच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, ’’संजीव ठाकूर यांचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी अटक करण्याची गरज असल्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सभागृहात सांगता येणार नाही. मात्र काही धागेदोरे, पुरावे आढळल्यास कारवाई होणारच’’, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस म्हणाले, ’’याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर षडयंत्र सुरू आहे. आपल्याकडे किनार्यावर वाहून आलेले ड्रग्ज सापडले. त्यावर पाकिस्तानचा शिक्का होता. यावरून षडयंत्र सुरू असल्याचे स्पष्ट होते. आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांत ड्रग्ज तयार करण्यासाठी कारखाने उघडले असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS