सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारे म्हणजे तीन महिन्यांचं बाळ

मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली

जळगाव प्रतिनिधी - शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे( Susama andhare) आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव

Jalgaon : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार | LokNews24
दिव्यांग उपक्रमांच्या अनुदानबाबतचे धोरण मंजूर
गुलाबराव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत नृत्याचा लुटला आनंद.

जळगाव प्रतिनिधी – शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे( Susama andhare) आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांचं होमटाऊन असलेल्या धरणगाव शहरात होत आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात आल्या असून त्या तीन महिन्यांचं बाळ आहेत. या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर चिखलफेक केलेली आहे. तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत, त्याच्याही क्लिप दाखवाव्यात. आम्ही आमच्यावर केलेल्या टीका सहन करणार नाही, असा इशारा गुलाबरावांनी अंधारेंना दिला आहे.

COMMENTS