Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काटेकोरपणे सर्वेक्षण पूर्ण करावे-जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक - केंद्र सरकारमार्फत 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पयाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी एप्रिल, 2022

सैन्य भरतीच्या अमिषाने फसवणूक
राहाता नगरपरिषद मुंबई दुर्घटनेतून धडा घेणार का ?
संगमनेर तालुक्यात नवदाम्पत्याची आत्महत्या

नाशिक – केंद्र सरकारमार्फत 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पयाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी एप्रिल, 2022 ते मार्च, 2027 या कालावधीत ‘नवभारत सारक्षता कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर होणारे सर्वेक्षण काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नवभारत साक्षरता कार्यक्रमाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हास्तरीय नियामक परिषदेचे सदस्य सचिव भगवान फुलारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी उप शिक्षणाधिकारी (योजना) आर. आर. बोडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, गावपातळीवर करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी मुख्याध्यापकांच्या मदतीने सर्वेक्षकांची निवड करून त्यांची यादी येत्या दोन दिवसात सादर करावी. त्यानंतर करण्यात येणारे सर्वेक्षण 15 दिवसांत पूर्ण करण्यात यावे. तसेच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात जे लोक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची देखील माहिती घेण्यात यावी. त्याचप्रमाणे सर्वेक्षण करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची माहिती ही सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी दिल्यात.

बैठकी दरम्यान प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. आर. बोडके यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टिने करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या माहितीचे सादरीकरण करतांना सांगितले की, जिल्ह्यात 2023-24 या वर्षासाठी  28 हजार 253 इतके उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी 53 लाख 89 हजार 260 इतका निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे NIEP या ॲपवर सर्व गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचे रजिष्ट्रेशन करण्यात आले आहे. तालुका व शाळानिहाय निश्चित केलेल्या निरक्षर उद्दीष्टाप्रमाणे स्वंयसेवकांची निवड करण्यात आल्याचेही श्री. बोडके यांनी सांगितले.

COMMENTS