Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या प्रभारीपदी सुरेश म्हेत्रे

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्‍लेषक व शब्दभुमी वृत्तपत्रांचे निर्भिड पत्रकार सुरेश म्हेत्रे यांची

म.गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी; माजी आ.मुरकुटे
BREAKING: आता नगरकरांचा जनता कर्फ्यू | Lok News24
शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू l पहा LokNew

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्‍लेषक व शब्दभुमी वृत्तपत्रांचे निर्भिड पत्रकार सुरेश म्हेत्रे यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेड अहमदनगर जिल्हा मीडिया प्रभारी पदी नुकतीच निवड करण्यात आली असून राष्ट्रीय फुले ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण बनसोडे, प्रदेश प्रभारी अमोल बारवकर, केंद्रीय कोअर कमिटी सदस्य विनोद माळी, राष्ट्रीय फुले ब्रिगेड मीडिया प्रभारी महाराष्ट्र राज्य सागर जैवाळ यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
सामाजिक जीवनात कार्य करत असताना विविध कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे तसेच अगदी तंतोतंत राजकीय विश्‍लेषण करणारे, आपले परखड मत मांडणारे असे सुरेश म्हेत्रे सर यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेड अहमदनगर जिल्हा मिडिया प्रभारी पदी निवड करण्यात येत आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी  सागर जैवाळ राष्ट्रीय फुले ब्रिगेड  प्रभारी महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा दिल्या. निवडीबाबत बोलताना सुरेश म्हेत्रे म्हणाले की राष्ट्रीय फुले ब्रिगेड चे अहमदनगर जिल्हा मध्ये प्रचार, प्रसार तसेच समाज हिताचे काम करण्यास नक्कीच अग्रेसर राहील तसेच राष्ट्रीय फुले ब्रिगेड चे विचार समाजाच्या तळागाळपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी  सांगितले. राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या मिडिया प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यासह तालुक्यातुन सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS