Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला 31 मेपर्यंत पोलिस कोठडी

पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवालला 4 दिवसांपर्यंत पो

मुंजवडी गावातील हातभट्टीचे अड्डे उध्वस्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई
पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा फलदायी…. मिळाला १५७ वस्तूंचा खजिना…
लासुर मुक्कामची बस पलटी झाल्याने ड्रायव्हर सह प्रवासी जखमी

पुणे ः पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवालला 4 दिवसांपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता 31 मेपर्यंत पोलिस कोठडीत असणार आहेत. सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल या दोन्ही बाप-लेकाला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ड्रायव्हरचे अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, अन तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते. विशाल अग्रवालला याप्रकरणी उशीरा अटक दाखवण्यात आलेली आहे. कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

COMMENTS