मुंबई ः मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च

मुंबई ः मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामीन याचिका निकाली निघेपर्यंत जामीन लागू राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान ईडीकडून नवाब मलिकांच्या वैद्यकीय जामिनाबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही, असे सांगण्यात आले. नवाब मलिक हे काही दिवसांपासून मेडिकल जामीनावर बाहेर आहेत. मलिक यांनी जामिनाला मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. याआधी त्यांना आठवडा किंवा दोन आठवडा अशी मुदत मिळत होती. त्यामुळे त्यांना वारंवार अंतरिम जामीनासाठी अर्ज करावा लागत होता.
COMMENTS