Homeताज्या बातम्यामनोरंजन

सनी देओलने गुपचूप उरकला मुलाचा साखरपुडा

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही धर्मेंद्र पडद्यावर सक्रिय आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुले सनी देओल आणि

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सनी देओलने तोडले मौन
सनी देओलचा ‘गदर 2’ च्या प्रमोशनला सुरुवात
सनी देओलने केले ‘ऍनिमल’मधील बॉबी देओलच्या अभिनयाचे कौतुक

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही धर्मेंद्र पडद्यावर सक्रिय आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांनीसुद्धा इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशातच सनी देओलचा मुलगा करण देओलनेसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र आजोबा आणि वडिलांप्रमाणे त्याला यश मिळू शकलं नाही. सध्या करण आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. करण लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनोरंजनसृष्टीत देओल कुटुंबाशी संबंधित बातम्या सतत कानावर येत असतात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी नुकतंच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सध्या सनी देओल आपल्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.अशातच आता देओल कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सनीने आपला मुलगा करण देओलचा गुपचूप साखरपुडा उरकला आहे. परंतु ही गोष्ट त्यांनी अत्यंत खाजगी ठेवली आहे. रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमात फक्त देओल कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित होते. करणच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे.

COMMENTS