मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमधील बंडाळी वाढत असून, अजित पवारांनी थेट पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसच
मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमधील बंडाळी वाढत असून, अजित पवारांनी थेट पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त केल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली असून, सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादीत मोठी फूट पाडत बंडखोरी करणार्या अजित पवार गटाने जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याची घोषणा केली आहे. तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबाबत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली आहे. एका आयोजित पत्रकार परिषदेत पटेल यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना पटेल म्हणाले आहेत की, पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो. ते म्हणाले, जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करत आहोत. त्यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत. राष्ट्रवादीचे संघटनात्मक धोरण प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. संघटनात्मक दृष्टीने नियुक्त्या करण्यास सुरुवात करण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पक्षाच्या 21 जूनच्या कार्यक्रमामध्ये पक्षाने अधिकृत रीतीने राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्षाची जबाबादारी दिली होती. सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाच्या अधिवेशनमध्ये पक्षाच्या संघटनात्मक नियुक्ती मी जाहीर केल्या होत्या. यावेशळी जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्रा प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी दिली होती असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्तता करण्यात येत आहे. जयंत पाटील यांना अधिकृतरित्या याबबात कळवण्यात आले आहे. सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील सर्व संघटनात्मक पदांच्या नियुक्त्या या सुनील तटकरेमार्फत केल्या जातील. नियुक्त्यांबाबतचे सर्व अधिकार त्यांना देण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर – युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी यावेळी बोलताना विरोधी पक्षनेता आणि प्रतोद या पदांवर एकच व्यक्ती असू शकत नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे राष्ट्रवादीतून बडतर्फ – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी आमच्यासोबतच संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार यांनी पुन्हा पक्षाची मोर्चेबांधणी करण्याची घोषणा केली. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती. या मागणीला शरद पवारांनी मंजुरी दिली असून पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे.
COMMENTS