Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; दोन वैमानिक हुतात्मा

गुवाहटी : आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी रात्री भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू-30-एमकेआय प्रकारातील लढाऊ विमान कोसळल्याची दुर्दैव

या राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी
रामलल्लांच्या दर्शनासाठी सातारा-अयोध्या एसटी सज्ज; 25 नोव्हेंबरला 45 भाविक होणार रवाना
ट्विटरच्या नवीन सीईओपदी लिंडा याकारिनो यांची नियुक्ती
भारतीय वायुसेनेचे सुखोई विमान कोसळले; महाराष्ट्रातील फ्लाइट लेफ्टनंट  पूर्वेश दुरुगकर यांचा मृत्यू; स्क्वाड्रन लीडर अनुजही मृत्युमुखी

गुवाहटी : आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी रात्री भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू-30-एमकेआय प्रकारातील लढाऊ विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत वायुसेनेचे दोन वैमानिक हुतात्मा झाले. फ्लाइट लेफ्टनंट अनुप आणि पूर्वेश दुरुगकर अशी हुतात्मा वैमानिकांची नावे आहेत.
भारतीय वायुसेनेने या घटनेची अधिकृत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होते. आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केल्यानंतर सुमारे साठ किलोमीटर अंतरावरील कार्बी आंगलोंग परिसरात विमान कोसळले. विमानाशी संध्याकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटांच्या सुमारास शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी विमान बेपत्ता झाल्याची माहिती वायुसेनेकडून देण्यात आली. संपर्क तुटल्यानंतर तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. उशिरा रात्री शोध मोहिमेदरम्यान अपघातग्रस्त विमानाचा ठावठिकाणा लागला. मात्र दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सुखोई एसयू-30-एमकेआय हे दोन आसनी प्रगत लढाऊ विमान असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मानले जाते. दरम्यान, या दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी वायुसेनेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच हुतात्मा वैमानिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

COMMENTS