नगर-मनमाड महामार्गावर कोंडी ; सुचवल्या तातडीच्या उपाययोजना अहिल्यानगर : नगर-मनमाड महामार्गावरील रखडलेल्या रस्ता कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळ-संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र कायम असून, या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी नागरिक, वाहनचालक व स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या. पाहणीदरम्यान पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी उपस्थित होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक व प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन न थांबता जबाबदारी स्वतःवर घेतली. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा व वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन,” असे ठाम व संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले. सध्याच्या परिस्थितीत प्रशासनासोबतच नागरिकांनीही संयम ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी अधोरेखित केले. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत संबंधित कंत्राटदार व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्याचे संकेतही त्यांनी दिले. होमगार्डचा पगार देणार परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन न थांबता जबाबदारी स्वतःवर घेतली. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा व वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन,” असे ठाम व संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले.

नगर-मनमाड महामार्गावर कोंडी ; सुचवल्या तातडीच्या उपाययोजना
अहिल्यानगर : नगर-मनमाड महामार्गावरील रखडलेल्या रस्ता कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळ-संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागण्याचे चित्र कायम असून, या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
डॉ. विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली. रस्त्याचे अपूर्ण काम, अव्यवस्थित वळणमार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी नागरिक, वाहनचालक व स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या. पाहणीदरम्यान पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे, तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक व प्रकाशव्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन न थांबता जबाबदारी स्वतःवर घेतली. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा व वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन,” असे ठाम व संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले.
सध्याच्या परिस्थितीत प्रशासनासोबतच नागरिकांनीही संयम ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी अधोरेखित केले. काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल, असे सांगत संबंधित कंत्राटदार व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
होमगार्डचा पगार देणार
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन न थांबता जबाबदारी स्वतःवर घेतली. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे, तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांचा त्रास कमी व्हावा व वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी गरज भासल्यास “होमगार्डचा पगार मी स्वतः देईन,” असे ठाम व संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले.

COMMENTS