संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात या वर्षी चांगला पाऊस झालेला असून सर्व धरणे भरलेली आहेत. काँग्रेसचे ने
संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात या वर्षी चांगला पाऊस झालेला असून सर्व धरणे भरलेली आहेत. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे कालव्यांचे पाणीही कार्यक्षेत्रातील बर्याच गावांमध्ये उपलब्ध झालेले आहे. कारखान्याने कायम उच्यांकी भावाबरोबर शेतकरी सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कार्यक्षेत्रातून सन 2025-26 चा गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा-निडवा पिक घेणार्या ऊस उत्पादकांसाठी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक मंडळाने विविध अनुदानित ऊस विकास योजना सुरु करण्यात आल्याची माहिती चेअरमन प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांनी दिली आहे.
ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत माहिती देताना ते म्हणाले की, कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नवीन ऊस लागवडीसाठी प्रती एकरी 5500 ऊस रोपे (4*2 फुट सरीमध्ये) प्रती रोप रुपये 1.70 पैसे या अनुदानित दराने शेतकर्यांचे बांधावर पोहोच केले जाणार आहेत. तसेच स्वतः ऊस रोपे तयार करणार्या शेतकर्यांना प्रती एकरी 150 प्लास्टिक ट्रे व 20 गोण कोकोपीट 50 टक्के अनुदानावर वसुलीचे अटीवर दिले जाईल. जे शेतकरी सुपर केन नर्सरी द्वारे ऊस रोपे तयार करणार असतील त्यांना कारखान्यामार्फत मार्गदर्शन व एकरी रूपये 1500/ प्रमाणे अनुदान दिले मिळेल. जे शेतकरी प्रमाणित बेणे प्लॉट मधील बेणे ऊस लागवडीसाठी विकत घेऊन वापरतील त्यांना बेणे रक्कम म्हणून रु 10,000/प्रती एकरी वसुलीचे अटीवर दिले जाते. हिरवळीचे पिकांमुळे जमिनीचा पोतसुधारत असल्याने जे शेतकरी कारखान्याकडून ताग व धैंचा बियाणे घेऊन हिरवळीचे पिक घेतलेनंतर त्या क्षेत्रात ऊस लागवड करतील त्यांना त्यांचा ऊस गळीतास आलेनंतर निवळीचे खताचे बियाणाची 50% रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. राजहंस सेंदीय खत व अमृतशक्ती दाणेदार सेंद्रीय खते (प्रोम फटीलाझर) तसेच बायो फटीलाझर वापरणे गरजेचे आहेत. 2025 – 26 गळीताचे ऊसासाठी ऊस उत्पादकांना 50% अनुदानावर वसुलीचे अटीवर प्रती एकरी 1 मे टन अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत देण्यात येते. कार्यक्षम पाणी वापर करून प्रती हेक्टरी ती जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणेसाठी कारखान्याने 4000 मीटर नॉन आय एस आय पेप्सी लॅटरल 50% अनुदानावर वसुलीचे अटीवर देण्याचे धोरण घेतलेले आहे. वेळोवेळी ऊस पिकावर येणार्या रोग व किडींचे बंदोबस्त करण्यासाठी कारखान्यामार्फत किटकनाशके व बुरशीनाशके उपलब्ध करून दिली जातात. तसेच बेणे घुटी करणेसाठी बड कटर मशीन, पाचट कुटीसाठी मल्चर मशीन, डिक्सप्लाऊ, बुडखे छाटणी मशीन, सब सॉयलर नांगर इ. अवजारे नाम मात्र भाडे आकारून ऊस उत्पादकांना उपलब्ध करून दिली जातात. याच बरोबर 2024-25 या हंगामातील लागवडीचा ऊस तुटलेनंतर शेतकर्यांनी उसाचा शास्रोक्त पद्धतीने खोडवा, निडवा ठेवणे गरजेचे आहे. या करिता कारखान्याचे शेतकी व ऊस विकास विभागाचे वतीने शेतकर्यांना विशेष मार्गदर्शन केले जात आहे. या बाबतच्या आधिक माहितीकरिता ऊस उत्पादकांनी कारखान्याचे विभागीय गट कार्यालय किवा ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे व सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व शेतकी विभागाने केले आहे.
COMMENTS