Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार ः राजेंद्र नागवडे

नागवडे कारखान्याची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

श्रीगोंदा :  नागवडे साखर कारखान्याची आर्थिक परीस्थिती उत्कृष्ट असून कारखाना कायम ऊस उत्पादकाला डोळ्यासमोर ठेवून ध्येयधोरणे ठरवतो. सन 2024-25 च्या

पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,
परिमल निकम यांना कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी पुरस्कार
वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल

श्रीगोंदा :  नागवडे साखर कारखान्याची आर्थिक परीस्थिती उत्कृष्ट असून कारखाना कायम ऊस उत्पादकाला डोळ्यासमोर ठेवून ध्येयधोरणे ठरवतो. सन 2024-25 च्या गाळप हंगामात संचालक मंडळ जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव देणार असे जाहीर करत नेहमीप्रमाणे याही वर्षी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याच्या मंगळवारी पार पडलेल्या 59 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.

नागवडे कारखान्याची 59 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी 2 वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले, आम्ही कधीही चुकीचा कारभार करत नाही व व भविष्यातही कदापिही करणार नाही. राजकारणासाठी काही ठराविक व्यक्ती जाणीवपूर्वक कारखान्याविरोधात सातत्याने तक्रारी करतात. या त्रासदायक लोकांमुळे कारखाना व सभासदांचे नुकसान होत आहे. कारखान्याला ’एनसीडीसी’ मार्फत 103 कोटींचे कर्ज मिळणार असून त्याचा कारखान्याला विकासात्मक फायदा होणार आहे. गतवर्षी ऊसतोडणीदारांमुळे हंगामातील गाळपाचे काहीसे नियोजन बिघडले. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर भाषणात म्हणाले की, कारखान्याकडे कामगारांची सहा कोटींची देणी आहेत. अनेकप्रकारे कारखाना हीत सोडून संचालक मंडळ अनावश्यक खर्च करतआहे. शेतकर्‍यांची कामधेनु टिकविण्यासाठी असे प्रकार बंद होणे गरजेचे आहे. ढिसाळ नियोजनामुळे लाखो टन ऊस बाहेरच्या जिल्ह्यात जात आहे. असाच कारभार राहिला तर ऊस उत्पादकांना कोणीच वाली उरणार नाही. काँग्रेस नेते घनश्याम शेलार म्हणाले की, नागवडे कारखाना भाव कमी देत असल्यामुळे व ऊसतोडणीच्या तांत्रिक नियोजनाअभावी बाहेरील कारखाने याचा लाभ घेत आहेत. कारखान्याच्या स्टोअर विभागाकडे नोंदीनुसार साहित्य शिल्लक नाही तर अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप घनश्याम शेलार यांनी यावेळी केला. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे, प्रशांत दरेकर, ऋषिकेश भोईटे, त्रिंबक मुठाळ, राजेंद्र भोस, शरद गद्रे आदींची भाषणे झाली. सभेला कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, दीपक नागवडे, जिजाबापू शिंदे, लक्ष्मण नलगे, भाऊसाहेब कोळपे, हरिदास शिर्के, संदीप नागवडे, टिळक भोस, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते.

COMMENTS