Homeताज्या बातम्याशहरं

ट्रकमधून पडून ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

देवळाली प्रवरा : कराड येथील कारखान्यासाठी ऊस तोडणी कामगारांना घेवून जात असलेल्या चालत्या मालट्रक मधील ऊस तोडणी कामगार तोल जावून पडल्याने ऊसतोडणी

गडाख कुटुंबीयांची दुर्गाताई तांबे यांनी घेतली भेट
मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचीही आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN
शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटमधील फसवणुकीची चौकशी करा

देवळाली प्रवरा : कराड येथील कारखान्यासाठी ऊस तोडणी कामगारांना घेवून जात असलेल्या चालत्या मालट्रक मधील ऊस तोडणी कामगार तोल जावून पडल्याने ऊसतोडणी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.हि घटना राहुरी फॅक्टरी परिसरात नगर मनमाड महामार्गवर हॉटेल वने पाटील समोर बुधवारी पहाटे घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथुन कराड साखर कारखान्यात ऊस तोडणी कामगारांना घेऊन जात असलेला मालट्रक क्रमांक एमएच 18 ऐसी 9966 हा पहाटेच्या सुमारास नगर मनमाड महामार्गाने राहुरी फॅक्टरी परिसरातून जात असताना हॉटेल वणे पाटील समोर ऊस तोडणी कामगार भारत शिवदास भिल (वय 25 वर्षे,राहणार शिंगवे, ता.शिरपूर, जि.धुळे) हा चालत्या मालट्रक मधुन तोल गेल्याने खाली पडला. त्याचा जागेवर मृत्यू झाला. दरम्यान रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS