Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योगाला फटका : पी. आर. पाटील

इस्लामपूर : ऊस तोडणी व वाहतूक करार स्विकारताना कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील. समवेत विजयराव पाटील, देवराज पाटील, विराज शिंदे, श्रेणीक कबाडे, माणि

सागरेश्‍वरच्या डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन
कवठेत ड्रोनव्दारे औषध फवारणी ; ग्रामीण शेतकर्‍यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे नदी संवाद यात्रेचा प्रारंभ

इस्लामपूर /प्रतिनीधी : केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योगाला मोठा फटका बसत आहे. आता केवळ साखर निर्मिती करून चालणार नाही. त्यामुळे आपण इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले असल्याचा विश्‍वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला.
राजारामनगर येथे साखराळे युनिट, वाटेगाव- सुरुल शाखा, कारंदवाडी युनिट व तिप्पेहळ्ळी (जत) च्या सन 2022-23 च्या ऊस तोडणी, वहातूक करार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक देवराज पाटील, विराज शिंदे,श्रेणिक कबाडे,माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, जनरल मॅनेंजर एस. डी. कोरडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट अमोल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
पी. आर. पाटील म्हणाले, सरकारला वाटते, साखरेचा दर वाढला की महागाई वाढते. पण साखर तयार करण्यास 3600 रुपये खर्च येतो व साखर विक्रीचा दर 3100 रुपये आहे. आता साखर कारखान्याना भवितव्य नाही. त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे काळाची गरज आहे. आपण एक हजार टनाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करत आहोत. इथेनॉलला चांगला दर आहे. आपल्या चारही युनिटने ठेवलेले उदिष्ट आपल्या सर्वाच्या सहकार्याने निश्‍चितपणे पूर्ण होईल.
प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी तोडणी कंत्राटदार बाजीराव शेवाळे, संभाजी कामेरीकर, श्रीपती चव्हाण, अर्जुन कचरे, पांडुरंग पाटील, आबा यमगर, माणिक पवार, मादाण्णा महिलापुरे, दिलावर पटेल, संदीप डांगे, अशोक वाटेगावकर यांच्यासह कंत्राटदारांशी करार करण्यात आले.
याप्रसंगी प्रेमनाथ कमलाकर, डी. एम. पाटील, महेश पाटील, मुकेश करळे, शिवाजी चव्हाण, सुजय पाटील, विजयनाना मोरे, अमोल कदम, संग्राम पाटील, महेश कदम, अभिजित कुंभार, रोहित साळुंखे, श्रीधर चव्हाण, संग्राम पाटील, प्रणिल पाटील, विजय कुलकर्णी, चंद्रकांत जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे यांनी आभार मानले.

COMMENTS