Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘अशोक’ च्या गळीत हंगामाचा शुक्रवारी साखर आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ

तरी या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अशोक कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कार्यकारी संचालक संतोष देवकर यां

श्रीरामपूर - अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वा. राज्याचे साखर आयुक्

पुरुषवाडी व वांजुळशेत शाळेची अव्वल कामगिरी
अ‍ॅड. चुडीवाल यांच्या निरपेक्ष सेवेचा आदर्श – डॉ. राजीव शिंदे
शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आंदोलन

श्रीरामपूर – अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि.२८ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वा. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी दिली.
     अशोक कारखान्याचा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम हा कारखान्याचा ६६ वा गळीत हंंगाम असून यावर्षीच्या गळीत हंगामाची सर्व पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार (ता.२८) रोजी दुपारी २ वा. राज्याचे साखर आयुक्त श्री.शेखर गायकवाड यांचे हस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे आदि प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत. तसेच यानिमित्त कारखान्याचे संचालक श्री.ज्ञानेश्वर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शोभाताई शिंदे, तसेच अधिकारी श्री.सुनील चोळके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वैशालीताई चोळके या दाम्पत्यांचे हस्ते विधीवत गव्हाण पुजन होणार आहे.
    तरी या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अशोक कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तसेच हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी केले आहे.

COMMENTS