Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी सुधीर पुंडेकर सज्ज

कराड / प्रतिनिधी : दि. 12 ते 20 एप्रिल रोजी किर्गिस्तानची राजधानी बिसेक येथे होणार्‍या जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस

टीम इंडियाचा 41 धावांनी शानदार विजय
कोमल वाकळे हीचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जल्लोषात स्वागत
इस्लामपूर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

कराड / प्रतिनिधी : दि. 12 ते 20 एप्रिल रोजी किर्गिस्तानची राजधानी बिसेक येथे होणार्‍या जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग ग्रॅण्ड पिक्स स्पर्धेसाठी सुधीर पुंडेकर यांची भारतीय संघात निवड झाली आहे. मुळीकवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सुधीर पुंडेकर हा कुस्तीगिर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने यश मिळवत आहे. भारतामध्ये बेल्ट रेसलिंग कुस्ती प्रकारात सुधीर नशीब आजमावत आहे. सुधीर किर्गिस्तान येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
बेल्ट रेसलिंग या कुस्ती प्रकाराला जागतिक कुस्ती संघटना व ऑलिंम्पिक कौन्सलिंग ऑफ एशियाची मान्यता आहे. जागतिक पातळीवरील या कुस्तीचा इंडोअर आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश झाला आहे. अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जात खचून न जाता आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर तुर्कमेनीस्थानमध्ये सन 2017 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुधीर याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. किरगीझस्थान देशाच्या ममाकझोरी कैरातीबरोबर मिनिटांची कडवी झुंज दिली. जागतिक क्रमवारीत तो नवव्या स्थानावर राहिला.

COMMENTS