Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीर जगताप

कर्जत : कर्जत तालुक्यातील कुळधरणचे उपसरपंच सुधीर जगताप यांची राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नंदकुमार

कोपरगावकरांना मिळणार तीन दिवसाआड पाणी
सुरेगाव ग्रामपंचायत साजरा करणार 65 वा वर्धापन दिन
पाथर्डी तालुका क्रीडा शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र शिरसाट

कर्जत : कर्जत तालुक्यातील कुळधरणचे उपसरपंच सुधीर जगताप यांची राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे यांच्या सहीचे पत्र देवून त्यांची निवड करण्यात आली आहे. आ. अरुण जगताप यांच्या हस्ते सुधीर जगताप यांना गुरुवारी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत तालुकाध्यक्ष ड. बाळासाहेब शिंदे, पद्मसिंह तनपुरे यांच्या उपस्थितीत हे निवड पत्र देण्यात आले.
सुधीर जगताप हे कुळधरण जिल्हा परिषद गटातील संघर्षशिल युवा नेतृत्व म्हणून सर्वपरिचित आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनांचे नेतृत्व केलेले आहे. यापूर्वी ते आ. रोहित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकारणात सक्रिय होते. मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून पक्षाचे पद स्वीकारले आहे. यापूर्वी अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून पक्षाची पदे घेतली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत- जामखेड मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आ. रोहित पवार यांना त्यांच्याकडून धक्के दिले जात आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आमदार अरुणकाका जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी शुभेच्छा देऊन आपल्या कामासाठी आम्ही खंबीरपणे साथ देणार असल्याचे म्हणाले.
सुधीर जगताप, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक

COMMENTS