देशात भाजपकडून सुडाचे राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात भाजपकडून सुडाचे राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे

तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली शरद पवार आणि ठाकरे यांची भेट

मुंबई/प्रतिनिधी : तपास यंत्रणांसह विविध माध्यमातून देशातील राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री

फडणवीसांना धमकी देणारा किंचक नवलेला अटक
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 जागांसाठी 40 हून अधिक उमेदवार रिंगणात
सेन्सॉर बोर्डाच्या नकारानंतर ’72 हुरेन’ चा ट्रेलर रिलीज

मुंबई/प्रतिनिधी : तपास यंत्रणांसह विविध माध्यमातून देशातील राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. काल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा बातम्या येत होत्या याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा योग आज आला. कालच शिवरायांची जयंती होती. त्याच्या दुसर्‍याच दिवशी आमची भेट होते. आम्ही या भेटीतील काही लपवले नाही. देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचे राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असेच सुरु राहिले तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगना सख्खे शेजारी आहेत. राज्या राज्यात एक आपुलकीचे नाते राहिले पाहिजे. नवी सुरुवात आज झाली. त्याला आकार येण्यास वेळ लागेल. पण प्रयत्न तर केले पाहिजेत. देशातील मुलभूत प्रश्‍न सोडून इतर विषयांत हात घालण्यातच अनेकजण धन्यता मानत आहेत. पुढे जे काही ठरेल त्यावर वेळोवेळी माहिती दिली जाईल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद वाटला. ठाकरे आणि आमचे अनेक विषयांवर एकमत झाले आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर ‘मी साफ करतो की आज एक सुरुवात झाली आहे. आम्ही सर्व सांगितले आहे. आम्ही देशातील दुसर्‍या नेत्यांशी चर्चा करु. काय अपेक्षित आहे, काय करायला हवे यावर चर्चा होईल आणि तुम्हाला आम्ही त्याबाबत सर्व माहिती देऊ’, असेही राव यावेळी म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून टार्गेट केले जात असल्याचा मतप्रवाह असून, भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्यासाठी भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांनी तिसर्‍या आघाडीच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून, तेलंगणांचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत डिन डिप्लोमसी केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील भेट घेतली. महाराष्ट्रात सध्या ईडीच्या छाप्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस घायाळ झाली असून, भाजपकडून सुडाचे राजकारण केल्या जात असल्याची टीका आघाडी सरकारकडून केली जात आहे. त्यामुळे भाजप सरकारला 2024 मध्ये तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांकडून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या चर्चेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय मधुर होते. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राव सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. यापूर्वी त्यांनी अनेकदा थेट मोदींवरही शरसंधान साधले आहे. राव यांचा 17 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. हे निमित्त साधून मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. मात्र, राव काही केल्या मवाळ झाले नाहीत. त्यांनी केंद्रातल्या भाजपविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यात.

भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांची मोट बांधणार : चंद्रशेखर राव
केंद्रातल्या भाजप सरकारविरोधातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत नुकतेच तेलगंणाचे मुख्यमंत्री ‘केसीआर’ यांनी दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचा मनोदयही व्यक्त केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणालेत की, 2019 च्या निवडणुकीपूर्वी अनेक विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. मात्र, भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अनेक गोष्टी बदलल्यात. सध्याची परिस्थिती देशासाठी घातक सिद्ध होतेय. ती दिवसेंदिवस चिघळतेय. त्यामुळे तिसरी आघाडी उभारू. त्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, यावर त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.

COMMENTS