Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कानिफनाथ या तरुणाची अशीही समाजसेवा

टपरी चहाची मात्र हजारो लोकांना मोफत पाणी

जामखेड ः जामखेडच्या बस स्थानकावर चहाच्या टपरीवर हजारो लोकांना मोफत जारचे पाणी देणारा तरूण कानिफनाथ नागरगोजे विरळाच समाजसेवक पहायला मिळत आहे. सध्य

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावे : पोलिस निरीक्षक जाधव
सचिव जयराम जाधव यांची कोपरगावला भेट
कर्जतमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक

जामखेड ः जामखेडच्या बस स्थानकावर चहाच्या टपरीवर हजारो लोकांना मोफत जारचे पाणी देणारा तरूण कानिफनाथ नागरगोजे विरळाच समाजसेवक पहायला मिळत आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने प्रत्येक माणुस पाणी पाणी करत असतो. रस्त्यावर चालतांना कुठे पाणी मिळते याचा शोध घेतांना दिसतो.
बाटली बंद संस्कृतीमुळे प्रत्येक हाँटेलवाले, दूकानदार सिलबंद बाटलीचेच पाणी ठेवतात. कुठे कुठे जार ठेवलेले आहे.मात्र पाणी विचारले तर काय घ्यायचं का विचारतात. न विचारता पाणी प्याला तर पाणी फुकट नाही आणलं असेही म्हणतांना ऐकायला मिळते. अशा कोरड्या भावनेच्या वातावरणात समाजात काही आवलिय माणसांमूळे माणुसकी जिवंत असल्याची जाणीव होते. जामखेड बसस्थानकासमोर कानिफनाथ नागरगोजे या तरूणाची चहाची टपरी आहे. मोठ्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या टपरीवर  सकाळी 6 वाजेपासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत येणारे जाणारे प्रवाशी, एसटी कंडक्टर, ड्रायव्हर, नागरिक, शालेय मूलं. सर्वच जण अगदी मोफत पाणी पितांना दिसतात. भटके लोकं, कचरा, भंगार गोळा करणारे, अनेक गरिब लोक चहा न घेता जारचे पाणी पितात व जातात. चहा घेणारा, न घेणारा असं कधीही कानिफनाथ यांनी पाहिलं नाही.  कशाला पाणी घेता असंही कधी कोणालाही हटकत नाहीत. सकाळपासुन संध्याकाळपर्यंत किती चहा विकला आणि पाण्याचे जार कीती गेले याची चिंता न करता काहीतरी कमावल्याचा आनंद कानिफनाथ यांच्या चेहर्‍यावर हस्य स्वरूपात दिसतो.त्यांचा परमार्थी सभाव असल्याने चहा शौकीनांची पावलं त्यांच्या टपरिकडे वळतात. त्यांच्याकडे कायम असलेल्या वर्दळ/गर्दीमध्ये हजारो लोक जारचे मोफत पाणी पिऊन जातात. कानिफनाथ नागरगोजे त्यांच्या चहाच्या टपरीवर हजारो लोकांना मोफत पाणी देऊन अप्रत्यक्षरीत्या मोठी समाजसेवाच करत आहेत. अशा भावना जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.

COMMENTS