Homeताज्या बातम्यादेश

आकाश आनंद मायावतींचा उत्तराधिकारी

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाल

फुटबॉल स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूल प्रथम
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू
मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश आनंद हे आता पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. बसपाच्या बैठकीत मायावती यांनी आपला वारस म्हणून आकाश आनंद यांची घोषणा करत भविष्यात पक्षाची  हे आकाश सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची आणि सर्व राज्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. आकाश आनंदसोबत मायावती या बैठकीला पोहचल्या. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीत मायावती यांनी मोठी आणि महत्वाची  केली. या बैठकीत मायावतींनी आपला उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांचे नाव जाहीर केले. मायावतींच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मायावती काही काळ नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचा विचार करत होत्या, असे मानले जाते. मायावती यांनी 2024 लोकसभा निवडणूकीच्या  महिने आधी ही घोषणा केली. मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. या निवडणुकीत आकाश आनंद यांनी मेहनत घेतल्याचे बोलले जात आहे. आकाश आनंद यांच्या पक्षातील वाढत्या दबदब्यामुळे ते भविष्यात पक्षाची धुरा सांभाळू शकतील, अशी चर्चा होती. मात्र, मायावती  एवढ्या लवकर त्यांच्या नावाची घोषणा करतील हे अपेक्षित नव्हते. आज मायावतींनी अचानक आपला वारस आणि उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांची घोषणा करून सर्वांनाच चकित केले आहे.आकाश आनंद हे बसपा प्रमुख मायावती यांचे लहान भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. आकाशचे शालेय शिक्षण गुरुग्राममधून झाले. आकाश यांनी पुढील शिक्षण लंडनमध्ये  त्यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे.

COMMENTS