नाशिक- रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया यांच्यावतीने महा-आरएसएसडीआय २०२४ या मधुमेह तज्ज्ञांच्या परीषदेत दुसर्या दिवशी (१८ फे
नाशिक– रिसर्च सोसायटी फॉर दी स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया यांच्यावतीने महा-आरएसएसडीआय २०२४ या मधुमेह तज्ज्ञांच्या परीषदेत दुसर्या दिवशी (१८ फेब्रुवारी) वेगवेगळ्या विषयांवरील सत्र पार पडले. सध्या उपलब्ध असलेल्या उपचार प्रक्रिया, सुरु असलेले संशोधन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तर या परीषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल मधुमेह तज्ज्ञ संघटनेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर यांनी तज्ज्ञ मान्यवर तसेच सहभागी डॉक्टरांचे आभार मानले.
सुला विनियार्डस् येथे पार पडलेल्या या दोन दिवसीय परीषदेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केले होते. यामध्ये मुंबई येथील ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ.विजय पानिकर, डॉ.समीर चंद्रात्रे, डॉ.मनोज चोपडा, डॉ. अलका गांधी, डॉ.व्यंकटेश शिवाणे, डॉ.अमोल हरतालकर यांनी आपआपल्या विषयांसंबंधी मार्गदर्शन केले.
यानंतर परीषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.नारायण देवगांवकर यांनी दोन दिवसांच्या परीषदेतील चर्चेचा आढावा घेतला. या परीषदेच्या आयोजनासाठी विविध समित्यांतील सदस्यांनी अथ्थक परीश्रम घेतले. तसेच परीषदेतून सर्वसमावेशक चर्चा घडल्याने या परीषदेत सहभागी सर्वांचे आभार त्यांनी मानले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.राजश्री पाटील, डॉ.किरण बिरारी, डॉ.मयुरेश कुलकर्णी, डॉ.सुवर्णा तांबडे यांनी केले. तर आभार परीषद आयोजन समितीचे सह-अध्यक्ष डॉ.समीर शाहा यांनी मानले. आयोजन समिती सचिव डॉ.समीर चंद्रात्रे, सहसचिव डॉ.समीर पेखळे, डॉ.रमेश पवार, सायंटिफिक कमिटीचे अध्यक्ष डॉ.यशपाल गोगटे, डॉ.मनोज चितळे, खजिनदार डॉ.राहुल पाटील, सहखजिनदार डॉ.विजय धोंडगे, सहखजिनदार डॉ.किरण बिरारी, समन्वयक डॉ.सुवर्णा तांबडे, डॉ.मृणालीनी केळकर आदींनी परीश्रम घेतले.
मधुमेहात मूत्रपिंड विकारांचा धोकाः डॉ.पार्थ देवगांवकर – परीषदेदरम्यान आयोजित सत्रामध्ये मार्गदर्शन करतांना प्रसिद्ध मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ.पार्थ देवगांवकर म्हणाले, मधुमेही रुग्णांना मूत्रपिंड विकाराचा धोका अधिक प्रमाणात असतो. सद्यःस्थितीत प्रभावी औषधे उपलब्ध झालेली असून, रुग्णांमध्ये सकारात्मक परीणाम दिसून येत आहेत. मधुमेही रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीतून मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वेळीच ओळखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
COMMENTS