Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुस्ती स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाचे यश

कोपरगाव ः अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे 23 ऑगस्ट

जैन साधू-साध्वींना विहार मुभा असावी
मढी देवस्थानचा पैसा आणि मालमत्तेच्या गैरवापराला विरोध केल्यानेच मला मारण्याचा कट ः संजय मरकड
माशाचा तुकडा न वाढल्यानं लग्नात मारामारी; 11 जखमी

कोपरगाव ः अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व तालुका क्रीडा समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे 23 ऑगस्ट रोजी शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगावच्या 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेतून दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक व दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या दोन विद्यार्थ्यांची निवड दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे होणार्‍या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे, अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी दिली. या खेळाडूंच्या यशाबद्दल  को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीवदादा कुलकर्णी, प्राचार्य डॉ.बी.बी.भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS